शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

आत्महत्येची धमकी अन् तरुणीचे व्हिडीओ व्हायरल, इंस्टाग्रामवर झाली होती ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:04 IST

या प्रकरणी विनोबा भावेनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

मुंबई : इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने कुर्ल्यातील अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवत तिच्यावर प्रेम करत असल्याचे भासवले. ही मुलगी जाळ्यात अडकताच, त्याने या मुलीशी अश्लील चाळे केले. तिला आत्महत्येची धमकी देत, तिच्याकडून नग्न व्हिडीओ आणि फोटो काढून घेत, शारीरिक संबंधांची मागणी केली. मुलीने नकार देताच, त्याने हे फोटो आणि व्हिडीओ मुलीच्या नातेवाईकाला पाठवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ल्यात घडला आहे. या प्रकरणी विनोबा भावेनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

 विनोबा भावेनगर पोलिस ठाण्यात शिफॉन खान या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ मे ते १९ जून या काळात ही घटना घडली आहे. या प्रकरणी विनयभंग, धमकावणे आणि बदनामी केल्याप्रकरणी सोमवारी गुन्हा नोंदविला आहे. पीडित मुलगी कुर्ला पश्चिम परिसरात राहते. यातील आरोपी शिफॉनने मुलीला इन्स्टाग्रामवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठवून तिच्याशी ओळख केली. तिच्याशी मैत्री झाल्यानंतर शिफॉनने तिला प्रपोज केले. तिच्यावर मनापासून प्रेम करत असल्याचे सांगून शिफॉनने तिला भेटायला बोलावले. मुलगी भेटायला आल्यानंतर शिफॉनने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत, शारीरिक संबंधांची मागणी केली.

नग्न फोटोची सक्ती शिफॉनने तिला एक चिठ्ठी लिहून आत्महत्येची धमकी देत, मुलीला नग्न व्हिडीओ आणि फोटो पाठविण्यास भाग पाडले. शिफॉन हा मुलीकडे वारंवार शारीरिक संबंधांची मागणी करत होता. मुलीने त्याला नकार देत संपर्क तोडला. अखेर शिफॉनने मुलीने पाठविलेले फोटो आणि व्हिडीओ मुलीच्या नातेवाइकाला पाठवून तिची बदनामी केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिली आहे. यातील आरोपीचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी