शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धू मुसेवाला घरात घुसून मारायचे होते शूटर्सना; पोलिसांच्या वर्दीची केली होती खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:15 IST

Siddhu Moosewala : आता अशी माहिती समोर आली आहे की, मुसेवाला यांची हत्या करणार्‍यांना घरात घुसून मारायचे होते.

पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येप्रकरणी एकापाठोपाठ एक अनेक खुलासे होत आहेत. पंजाब व्यतिरिक्त दिल्ली आणि महाराष्ट्राचे पोलीसही शूटर्सना पकडण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र दिल्लीपोलिसांना यश मिळाले आणि सोमवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 3 शूटर्सना अटक केली.आता अशी माहिती समोर आली आहे की, मुसेवाला यांची हत्या करणार्‍यांना घरात घुसून मारायचे होते. यासाठी शूटर्सनी पोलिसांची वर्दीही खरेदी केली होती. सिद्धू मुसेवालाजवळ नेहमीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. त्यामुळे कॅनडामध्ये बसून गोल्डी ब्रारने प्रियव्रताला पोलिसांच्या गणवेशात गुन्हा करण्यास सांगितले होते. शूटर कट रचत असताना, संदीप केकरा याने 29 मे रोजी सिद्धूशिवाय सुरक्षा गृह सोडल्याची बातमी दिली.दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, सिद्धूला गोळ्या घालणाऱ्या प्रियव्रत फौजीचा सुगावा तुरुंगातील एका गुंडाकडून लागला. मुसेवालाच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांचे पथक सर्व तुरुंगात जाऊन गुंडांची चौकशी करत होते. यादरम्यान तुरुंगातील एका गुंडाने एक टीप दिली, अनेक दिवस त्याचा माग काढत दिल्ली पोलिसांचे पथक गुजरातमधील मुंद्रा येथे पोहोचले.

कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रार आणि तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला सिद्धूला कोणत्याही किंमतीत मारायचेच होते. मुसेवाला यांच्या मृत्यूची सर्वत्र चर्चा व्हावी, अशी दोघांची इच्छा होती. 28 वर्षीय सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी गायकाच्या हत्येची जबाबदारी घेतली. हत्येचे प्लॅनिंग खूप आधीपासून करण्यात आले होते. भरदिवसा घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.विशेष म्हणजे 3 शूटर्सना अटकसिद्धू मुसेवाला हत्याकांडातील तीन शूटर्स दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी गुजरातमधील मुंद्रा येथून अटक केली. आरोपींना दिल्ली न्यायालयात हजर केले असता तिघांनाही ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून आठ हातबॉम्ब, डिटोनेटर आणि ३६ राउंड पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. एके सीरिजची असॉल्ट रायफलही सापडली आहे.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसdelhiदिल्ली