शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांनी घरात शिरून केली वृद्धाची निर्घृण हत्या, लाखोंची रोकड घेऊन फरार; अंबड-लिंक रोडवरील शेतात थरार 

By अझहर शेख | Updated: November 26, 2022 06:24 IST

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.२५) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नाशिक : दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास घरात शिरून तीक्ष्ण हत्याराने एका वृद्धाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीत घडली आहे. बच्चू सदाशिव कर्डीले (६८) असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. 

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.२५) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्सलो पॉईंट येथे घडलेल्या या घटनेने नाशिक हादरले आहे. कर्डिले यांचे शेतकरी कुटुंब असून ते अंबड लिंक रोडवरील एक्सलो पॉईंट येथे शेतात राहतात. ते राहत्या घरी शुक्रवारी एकटेच होते. घरातील इतर कुटुंबीय नातेवाईकाच्या लग्न असल्याने हळदीच्या कर्यक्रमाला  गेलेले असताना दरोडेखोरांनी हा हल्ला केला अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. 

यात चार ते पाच हल्लेखोर होते. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ते घरात शिरले. यावेळी कर्डिले झोपण्याच्या तयारीत होते. त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार केला असता धारदार हत्याराने कर्डीले यांच्या हल्लेखोरांनी डोक्यावर धारधार हत्याराने गंभीर  वार करून ठार मारले. यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त करून सुमारे पाच ते दहा लाख रुपयांची रोकड लुटून पोबारा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळतात अंबड पोलीस तसेच शहर पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. 

गुरुवारी रात्री नाशिक शहरापासून जवळच पुणे महामार्गावर वडगाव पिंगळा गावात एका घरात असाच दरोडा टाकून दरोडेखोरांनी दागिन्यांची लूट केली होती. मायलेकाला जबर मारहाण करत घरात बांधून ठेवले होते. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास लागत नाही तोच पुन्हा नाशिक शहरातसुद्धा दरोडेखोरांनी वृद्धाचा निर्घृणपणे खून करून रोकड लुटल्याची घटना घडली. नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

टॅग्स :RobberyचोरीDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस