शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा घडला त्याच तारखेला ‘निकाल’; बालिकेवर बलात्कार, हत्या प्रकरण; दोषीला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 08:46 IST

पेण शहरातील मळेघर आदिवासी वस्तीवरील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची घटना २० डिसेंबर २०२० रोजी घडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पेण शहरातील मळेघर आदिवासी वस्तीवरील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची घटना २० डिसेंबर २०२० रोजी घडली होती. बुधवारी २० डिसेंबर २०२३ रोजी बरोबर तीन वर्षांनी यातील दोषी आदेश पाटील याला अलिबाग जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 

या खटल्यातील विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे या खटल्याचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. बुधवारी जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय एस. राजंदेकर यांनी हा निकाल दिला. या शिक्षेबाबत उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे ॲड. निकम यांनी म्हटले आहे.

जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती. या खटल्यात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला होता. गुरुवारी, १४ डिसेंबर रोजीच्या सुनावणीतच न्यायाधीश अजय राजदेकर यांनी आरोपी हा दोषी असल्याचे म्हटले होते. १८ डिसेंबर रोजीच्या सुनावणीत ॲड. निकम यांनी त्याला फाशी द्यावी, तर आरोपी वकील पक्षातर्फे जन्मठेप मिळावी यासाठी युक्तिवाद केला होता. न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. 

शिक्षा अशी...आरोपी आदेश पाटील याला न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस दोषी पकडून जन्मठेपेची शिक्षा व  ५,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दुसऱ्या कलमानुसार दोन वर्षांची शिक्षा व  १,००० रुपयांचा  दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, अलिबाग येथे एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो घरी आला असता त्याने हे कृत्य केले. पेण पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली होती.

आरोपीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहोत. आरोपी याच्यावर दहा गुन्हे दाखल असून, दोन बलात्काराचे गुन्हे आहेत. अनेक गुन्हे करूनही आरोपी सुधारलेला नाही.  त्यामुळे समाजासाठी तो घातक आहे. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी उच्च न्यायालयात अपील करणार आहे.    - ॲड. उज्ज्वल निकम,    विशेष सरकारी वकील

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी