शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:17 IST

राजा आणि सोनम यांनी लग्नापूर्वी त्यांच्या आईच्या नावावर एक कंपनी सुरू केली होती आणि त्या कंपनीच्या खात्यात ७-८ लाख रुपये जमा केले होते.

मध्य प्रदेशातील इंदूर शहराचे प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत आहेत. आता राजा रघुवंशी यांचा भाऊ विपिन यांनी एक नवीन आणि धक्कादायक दावा केला आहे. विपिन यांच्या म्हणण्यानुसार, राजा आणि सोनम यांनी लग्नापूर्वी त्यांच्या आईच्या नावावर एक कंपनी सुरू केली होती आणि त्या कंपनीच्या खात्यात ७-८ लाख रुपये जमा केले होते. या पैशांचा वापर राजाच्या हत्येसाठीच केला गेला असावा, असा विपिन यांचा दावा आहे. राज कुशवाहाने याच पैशांतून विकास, आकाश आणि आनंदला पैसे दिले असावेत, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

७ आरोपींना अटक, नार्को टेस्टची मागणीराजा रघुवंशी यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. यात एका प्रॉपर्टी डीलरचा आणि एका चौकीदाराचाही समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांना शिलाँग येथे नेले आहे, जिथे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. इतर आरोपींची चौकशी सुरू आहे. राजाच्या कुटुंबीयांनी आता आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. यासाठी ते उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे राजाच्या कुटुंबीयांनी सांगितले.

खुनामागचे कारण अजूनही गुलदस्त्यातनार्को टेस्टच्या मागणीदरम्यानच, राजाच्या मोठ्या भावाने विपिनने आशंका व्यक्त केली आहे की, सोनम आणि राजाने मिळून जी कंपनी सुरू केली होती, त्याच कंपनीच्या पैशांतून राजाची हत्या घडवून आणली असावी. सोनमने राजाची हत्या का केली, या प्रश्नाचे ठोस उत्तर अद्यापही कुटुंबीयांना मिळालेले नाही. दुसरीकडे, मेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनम आणि राज यांच्यात प्रेमसंबंध होते आणि सोनम पतीच्या मृत्यूनंतर राजशी लग्न करू इच्छित होती. म्हणूनच दोघांनी मिळून राजाच्या हत्येचा कट रचला.

आठव्या आरोपीचा शोध सुरूमेघालय पोलिसांनी सोनम आणि राज यांची चौकशी केली असून, त्यांची रिमांड वाढवण्याची मागणी केली नाही, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. यावरून पोलिसांनी सोनम आणि राज यांची चौकशी पूर्ण केली असावी, असे मानले जात आहे. तरीही, या प्रकरणात एकामागून एक नवीन नावे समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांत या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता आणखी एका आरोपीचे नाव समोर आले आहे. शिलाँग पोलीस देवास नाका येथील एका मल्टीमध्ये राहणाऱ्या फ्लॅट मालक लोकेंद्र तोमरच्या शोधात आहेत. सोनम पळून गेल्यानंतर ज्या फ्लॅटमध्ये थांबली होती, तो फ्लॅट याच मल्टीमध्ये आहे.

आठव्या आरोपीचे नाव कसे समोर आले?शनिवारी या हत्याकांडातील एका प्रॉपर्टी ब्रोकरला आणि एका सिक्युरिटी गार्डला अटक करण्यात आली आहे. प्रॉपर्टी ब्रोकर सिलोम जेम्स याच्यावर आरोप आहे की, त्यानेच गार्ड बलवीरच्या मदतीने फ्लॅटमधून एक बॅग काढून ती जाळली होती. या बॅगमध्ये कथितरित्या राजाच्या मृत्यूचे पुरावे, पिस्तूल आणि सुमारे ५ लाख रुपये रोख होते. सिलोमने चौकशीत सांगितले की, हे सर्व त्याने फ्लॅट मालक लोकेंद्रच्या दबावाखाली केले. तसेच त्याने हेही सांगितले की, लोकेंद्रनेच बॅगमधून पिस्तूल आणि रोख रक्कम काढून घेतली होती. यामुळे या प्रकरणात लोकेंद्र तोमरची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार