पतीची दाढी पसंत नसल्यानं दीरासोबत पळालेल्या वहिनीच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अनेक दिवस दीरासोबत राहिल्यानंतर वहिनी पुन्हा घरी परतली तेव्हा बराच वाद झाला. त्यानंतर वाद विकोपाला गेल्यानंतर हे सगळे पोलीस स्टेशनला पोहचले. दाढीवाल्या पतीने पत्नीला तलाक दिला होता तेव्हापासून दीराला पती मानून ती त्याच्यासोबत राहू लागली. पत्नीने पोलीस ठाण्यात उपस्थित लोकांना ती दाढीमुळे पतीला सोडून पळाली नाही असं सांगितले. तर यामागे अन्य कारण आहे. पतीमध्येच खोट आहे असा आरोप पत्नीने केला.
मेरठच्या उज्ज्वल गार्डन येथील रहिवासी शाकीरचा निकाह ७ महिन्यापूर्वी अर्शी नावाच्या युवतीसोबत झाला. निकाहनंतर पत्नीने पतीला दाढी कापण्यासाठी दबाव आणला. मला दाढीवाले लोक आवडत नाही. त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. माझा जबरदस्तीने निकाह केल्याचं पत्नीने म्हटलं. शाकीरने दाढी कापण्यास नकार देत मौलानाकडे पत्नीची तक्रार केली. त्यातच क्लीन शेव असलेल्या दीरासोबत ती फरार झाली. शाकीरने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देत ३ फेब्रुवारीला छोट्या भावासोबत पळाल्याचे सांगितले.
हे प्रकरण जेव्हा पोलीस ठाण्यात पोहचले तेव्हा दोघांना शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. पोलिसांनी महिला आणि तिच्या नातेवाईकांवर मेरठला येण्यासाठी दबाव टाकला. बुधवारी संध्याकाळी अर्शी दीरासोबत पुन्हा घरी आली. अर्शीचे नातेवाईकही उज्ज्वल गार्डनला आले होते. तिथे मोठा गोंधळ झाला. पतीने ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना बोलावले. शाकीरची पत्नी अर्शी आणि दीर पोलिस ठाण्यात गेले. तिथे पत्नीने मला दीरासोबत राहायचे आहे असं सांगत पतीला तलाक द्यायचा असेल तर त्याने अडीच लाखांची मागणी केली.
दीरासोबत का पळाली?
पत्नीने पतीला सोडण्यामागे दाढी कारण असल्याचं नाकारले. पतीच वाईट आहे. त्यामुळे दीरासोबत पळाले असं तिने म्हटलं. मात्र पत्नी माफी मागत असेल तर मी तिला माझ्यासोबत ठेवायला तयार आहे असं शाकीरने म्हटलं. त्यावर अर्शीने नकार देत अडीच लाखांची मागणी ठेवली. त्यानंतर शाकीरने पत्नीला ३ तलाक दिले, त्यानंतर अर्शी दीरासोबत निघून गेली. आता मी तलाक दिला असून पुढचा जो काही निर्णय असेल पंचायत करेल अथवा घरातील लोक एकत्रित बसून निर्णय घेतील असं शाकीरने सांगितले.