शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पोलिसांनी नोंदविली नव्हती श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार, तीन महिन्यांपूर्वीची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:59 IST

माणिकपूर पोलिस संशयाच्या भोवऱ्यात; तीन महिन्यांपूर्वीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : तीन महिन्यांपूर्वीच श्रद्धा वालकर ही बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या चुलत भावाने माणिकपूर पोलिस ठाण्यात नोंदवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र माणिकपूर पोलिसांनी तक्रार न नोंदवता श्रद्धा परत येईल, असा अजब तर्क लावला होता. यामुळे माणिकपूर पोलिसच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

वसईतील श्रद्धा वालकर हिच्या दिल्लीत तिच्या प्रियकराकडून झालेल्या निर्घृण हत्येनंतर अवघा देश हादरला. श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून त्याची विल्हेवाट लावणारा प्रियकर आफताब पूनावालाविरोधात देशभर संतापाची लाट उसळलेली असताना या संपूर्ण प्रकरणात आता वसईतील माणिकपूर पोलिस ठाणे वादात सापडले आहे.

n दरम्यान, आरोपी आफताब पूनावाला याने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. त्याने अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीही दिल्याचे सूत्रांकडून कळते.n तीन महिन्यांपूर्वी श्रद्धाचा कोठेच थांगपत्ता न लागल्याने तिच्या चुलत भावाने तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती या चुलत भावाने पोलिसांना दिली आहे. मात्र त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. 

९० दिवस आरोपी फिरला उजळमाथ्याने१ श्रद्धाबाबतचे प्रकरण अधिक गंभीर होत गेल्याने माणिकपूर पोलिसांनी श्रद्धासंदर्भातली तक्रार नोंदवून तपास केला असता तर श्रद्धाच्या निर्घृण खुनाचा उलगडा लवकर झाला असता. २ या तब्बल ९० दिवसांत माणिकपूर पोलिसांनी दाखवलेल्या बेपर्वाईमुळेच श्रद्धाचा मारेकरी ९० दिवस उजळ माथ्याने वावरत राहिला. माणिकपूर पोलिसांनी वेळीच तक्रार नोंदवून घेतली असती तर श्रद्धाच्या मारेकऱ्याला पकडण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागलाच नसता. ३ दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या एका जबानीत श्रद्धाच्या चुलत भावाने हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे, मात्र आता श्रद्धाच्या चुलत भावाच्या जबानीनंतर माणिकपूर पोलिसांचा हलगर्जीपणा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

श्रद्धाच्या वडिलांचे आफताबशी खटकेश्रद्धा वालकर हिचे वसईत राहत असताना अनेकदा आफताबबरोबर खटके उडाले. त्यासंदर्भात तिने तुळिंज पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती, मात्र शेवटी आफताबने तिचा जीव घेतलाच. श्रद्धाची हत्या करून वसईत उजळ माथ्याने वावरणारा आरोपी आफताब पूनावाला हा माणिकपूर पोलिसांनी उशिरा दाखल केलेल्या तक्रारीमुळेच इतके दिवस गुन्हा करून उजळ माथ्याने वावरत राहिला, असे श्रद्धाच्या चुलत भावाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी