शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विवाहबाह्य संबंध उघड केले म्हणून तरुणीचा फोटो, क्रमांक टाकला अश्लिल साईटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 21:51 IST

Immoral relationship : तिला अश्लिल कॉल येऊ लागल्याने भाईंदरच्या नवघर पोलिसांनी मैत्रीण व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

मीरारोड - मूळच्या गुजरातच्या २२ वर्षीय तरुणीने मैत्रिणीचे असलेले विवाहबाह्य संबंध मैत्रिणीच्या पतीस सांगितले म्हणून मैत्रिणीने प्रियकरासोबत मिळून त्या तरुणीचे फोटो व भ्रमणध्वनी क्रमांक डेटिंग वेबसाईटवर टाकले. त्यावरून तिला अश्लिल कॉल येऊ लागल्याने भाईंदरच्या नवघर पोलिसांनी मैत्रीण व तिच्या प्रियकरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

गुजरातच्या राजकोट येथील न्यू महावीर नगर मध्ये राहणारी मेघा सोमपुरा हि ब्युटिशियन चे काम करते. कामा निमित्त भाईंदर पूर्वेस राहणाऱ्या तसेच लग्न आदी इव्हेंट काम करणाऱ्या एका विवाहिते सोबत जानेवारी महिन्यात तिची ओळख झाली व त्यातून दोघींची मैत्री झाली.  विवाहितेच्या ठाणे - घोडबंदर मार्गावरील पुराणिक सिटी मधील भाड्याच्या घरात मेघा राहू लागली. विवाहिता हि त्या भाड्याच्या घरी दिवसा येत असे.  तिचे विरारच्या चंदनसार येथे राहणाऱ्या आशिष राठोड सोबत विवाहबाह्य संबध होते.  ठाण्याच्या घरात विवाहित व आशिष वारंवार येत असत.  मेघा राजकोटला घरी गेली व फेब्रुवारी मध्ये परत आली असता ठाण्याचे भाड्याचे घर रिकामी केल्याचे तिला समजले. त्या विवाहितेने मेघाची तिच्या पती सोबत भाईंदर येथील घरी ओळख करून दिली होती. 

विवाहिता व आशिष सोबत राजस्थान येथे फिरून आल्या नंतर मेघा भाईंदर येथेच राहू लागली. कामासाठी ती गोवा येथे गेली असताना विवाहितेच्या पतीने तिला कॉल करून पत्नीचे आशिषसोबत अनैतिक संबंध असल्या बाबत विचारणा केली. त्यास मेघा हिने दुजोरा दिला. त्यामुळे विवाहितेच्या घरात वादंग झाला. त्याचा राग येऊन विवाहिता व आशिष हे मेघाला कॉल करून तसेच संदेश पाठवून शिवीगाळ करत धमकावू लागले. तुझे फोटो आता पॉर्न वेबसाईटवर टाकुन आयुष्यातुन उठवुन टाकणार अशी धमकी देऊ लागले. 

तोच ७ एप्रिल रोजी एका अनोळखी व्यक्तीने कॉल करून शरीरसंबंधाबाबत विचारणा केली. तिचा मोबाईल व फोटो हे लोकेंटो नावाच्या संकेतस्थळावर मिळाल्याची व त्यावर दराची रक्कम टाकलेली असल्याची माहिती त्या अनोळखी इसमाने मेघास दिली. तसेच त्या संकेतस्थळाचे स्क्रिनशॉट सुद्धा तिला पाठवले. त्याची मेघा हिने सोमवारी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोडPoliceपोलिसGujaratगुजरात