शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ज्याच्याशी लग्नासाठी घरच्यांशी भांडली, त्यानेच दीड महिन्यांत तिला संपविले, प्रेम कहाणीचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 10:28 IST

गौरवने दीपाचा मृतदेह गुपचूपरित्या स्मशानभूमीत नेऊन जाळला आहे. याची माहिती ना पोलिसांना ना दीपाच्या घरच्यांना दिली गेली.

दिल्लीत एका अल्पवयीन मुलीची प्रियकराने हत्या केल्याचे प्रकरण ताजेच असताना मेरठमधून धक्कादायक बातमी हाती येत आहे. गुरुग्रामच्या दीपाने कुटुंबाचा विरोध पत्करून साजन उर्फ गौरवशी दीड महिन्यांपूर्वी लग्न केले होते. परंतू, या लव्ह मॅरेजचा अंत झाला आहे. 

गौरवने दीपाचा मृतदेह गुपचूपरित्या स्मशानभूमीत नेऊन जाळला आहे. याची माहिती ना पोलिसांना ना दीपाच्या घरच्यांना दिली गेली. जेव्हा पोलिसांना दीपाच्या आईने याची माहिती दिली, तेव्हा पोलिसांना दिपाच्या सासरचे लोक घराला टाळे ठोकून फरार झाल्याचे आढळले. तीन दिवसांपूर्वी दीपाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे गौरवच्या शेजाऱ्यांनी सांगितले. 

पोलीस ठाणे प्रभारी योगेंद्र सिंह यांनी सांगितले की, गुडगावच्या अनिता यांनी कंट्रोल रूमला फोन करून माहिती दिली. दीड महिन्यापूर्वी त्यांची मुलगी दीपाचा शेरगढी येथील साजन उर्फ ​​गौरव याच्यासोबत कोर्ट मॅरेज झाले होते. दीपाच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता. दीपा गौरवसोबत शेरगढी येथे राहू लागली होती. 26 मे रोजी दीपाची हत्या केल्यानंतर सासरच्यांनी तिच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार केल्याची माहिती अनिताला कोणीतरी दिली. याबाबत माहिती मिळताच मेडिकल पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तेथे कोणीही आढळून आले नाही. सासरचे लोक पळून गेले आहेत.

तीन दिवसांपूर्वी दीपाला सासरचे लोक आजारी असल्याचे सांगून घेऊन गेले होते, त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समजले, असे शेजाऱ्याने पोलिसांना सांगितले. दीपाच्या नातेवाईकांना मेरठला बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतरच संपूर्ण घटना समजेल. दीपाचा पती साजन आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे, असे पोलीस म्हणाले. 

गुरुग्राममधील झाझर रोडवरील हॉस्पिटलमध्ये दीपा कामाला होती. इन्स्टाग्रामवर साजनशी ओळख झाली. साजन गुरुग्राममधील एका कंपनीत सुपरवायझर होता. यामुळे त्यांची वारंवार भेट होऊ लागली. तीन वर्षांपासून दोघेही एकमेकांसोबत राहू लागले होते. सहा महिन्यांपूर्वी दीपाने तिच्या कुटुंबीयांना साजनबद्दल माहिती दिली होती. तेव्हा दीपाला विरोध करण्यात आला होता. यामुळे दीड महिन्यापूर्वी दीपाने घर सोडले आणि साजनसोबत कोर्टात लग्न केले. 

अनिता यांनी सांगितले की, मुलीच्या प्रेमविवाहानंतर आम्ही माघार घेतली होती. दीपाशी रोज फोनवर बोलणे व्हायचे. रविवारपासून दीपाचा मोबाईल लागत नव्हता. यामुळे तिच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधला तेव्हा आम्हाला हे समजले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी