शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून वडाप व्यावसायिकाचा खून, 12 तासांत लागला छडा

By दत्ता यादव | Updated: December 11, 2022 14:57 IST

एकाला अटक; एलसीबीकडून १२ तासांच्या आत गुन्हा उघड

सातारा : पाटण तालुक्यातील भैरेवाडी येथील वडाप व्यावसायिकाच्या खुनाचा छडा लावण्यात स`थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, हाखून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाला असल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नारायण तुकाराम मोंडे (वय ४८, रा. भैरेवाडी, ता. पाटण) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडाप व्यावसायिक सीताराम बबन देसाई (वय ४९, रा. भैरेवाडी, ता. पाटण) हे शुक्रवार, दि. ९ रोजी रात्री जनावरांच्या शेडमध्ये झोपण्यासाठी गेले होते. रात्री गाढ झोपेत असताना डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मल्हार पेठ पोलिस आणि स`थानिक गुन्हे शाखेने तातडीने घटनास`थळी धाव घेऊन तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना या खुनाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे समजले. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातच सीताराम देसार्इयांच्या घरातल्या लोकांनीही संशय व्यक्त केला होता. संशयित नारायण मोंडे याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस त्याच्या घरी गेले. मात्र, तोऊरूल गावच्या हद्दीतील जंगलात लपून बसल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर एलसीबी टीम आणि मल्हार पेठे पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून जंगलात सात किलोमीटर पायपीट केली. त्यावेळी झाडात लपून बसलेल्या नारायण मोंडे याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने सीताराम देसार्इ यांचा खून केल्याची कबुली दिली. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा खून केला असल्याचे नारायण मोंडे याने पोलिसांना सांगितले.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल शेळके, सायबर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगांवकर, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, राजकुमार ननावरे, मोहन नाचण, स्वप्निल माने, शिवाजी गुरव, मयूर देशमुख आदींनी ही कारवार्इ केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस