शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय समितीच्या सदस्याला लोक भुरटा चोर समजले; खामगावात मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 13:03 IST

सकळकळे कॉम्पलेक्स परिसरातील घटना; मारहाणीची शहर पोलिसांत तक्रार

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: केंद्रीय कचरा मुक्त समितीच्या एका सदस्याला चक्क भुरटा चोर समजून मुख्य वस्तीतील सकळकळे कॉम्पलेक्स परिसरात मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली असून घडलेल्या घटनेची शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. तर  सदस्यांसोबत असलेल्या पालिकेच्या अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची चर्चा आहे.

स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीसाठी कचरा मुक्त समितीचे केंद्रीय पथक विविध पालिकांना भेटी देत आहे. खामगाव शहरातील स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीसाठी  खामगावात दिल्ली येथील एक पाच सदस्यीय पथक दाखल झाले. सदस्यांकडून झोन निहाय पाहणी सुरू असतानाच मुख्य वस्तीतील सकळकळे कॉम्पलेक्स नजीक एका सदस्याला चक्क  भुरटा चोर समजून मारहाण करण्यात आली. या प्रकाराने भांबावलेले पालिका अधिकारी आणि कर्मचाºयांनी घटनास्थळावरून अक्षरक्ष: पळ काढल्याची चर्चा आहे. या प्रकाराला पालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांनी दुजोरा दिलाय. त्याचवेळी घटनास्थळावरून अधिकारी, कर्मचाºयांनी पळ काढल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. याप्रकरणी संबंधितांविरोधात पालिकाप्रशासनाकडून पोलीसात तक्रार करण्यात आली आहे. शहर पोलीसांनी हे प्रकरण चौकशीवर ठेवले आहे.

दोन कानशीलात लगावल्या!- केंद्रीय कचरा मुक्त समितीचे सदस्य डेटा संकलनासाठी फोटोग्राफी करीत होते. त्यावेळी  कॉम्पलेक्समधील एका इसमाने खिडकीतून हा सर्व प्रकार पाहीला. कोणतीही शहनिशा न करताच केंद्रीय समितीच्या सदस्यावर हल्ला चढविला. हा प्रकार पाहून काहींनी घटनास्थळावरून पळ काढला. तर काहींनी वाद आवरण्यास मदत केली. पंरतु तत्पूर्वीच संबंधितांनी सदस्याच्या दोन कानशिलात लगावल्या.

डम्पींग ग्रांऊडचीही पाहणी- शहरातील सार्वजनिक शौचालय, उकीरडे तसेच कचरा टाकल्या जाणाºया ठिकांणांची पाहणी आणि तपासणी कचरा मुक्त शहर समिती कडून केली जात आहे. त्याचवेळी शहरातील डम्पींग ग्रांऊडचीही तपासणी या पथकाकडून करण्यात आली.

शिवाजी वेस भागातही वाद- कचºयाचे स्थळ पाहण्यासाठी पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाºयांकडून इन्कार करण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी शिवाजी वेस भागात केंद्रीय कचरा मुक्त समिती सदस्यांच्या समोरच पालिकेचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये शिवाजी वेस भागात वाद झाला. परिणामी, खामगावात समितीचे दोन्ही दिवस वादाचे ठरल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी