शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; सापळा रचत दोघांना अटक, ९ लाखांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 21:16 IST

१८ गुन्ह्यांचा उलगडा, १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, भंगारवालाही ताब्यात, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यामध्ये १४ जणांच्या टाेळीने घातला धुमाकूळ

राजकुमार जाेंधळे 

लातूर : साखर कारखान्याचे गाेदाम फाेडणाऱ्या अन् घरफाेड्या करणाऱ्या टाेळीतील दाेघांना स्थागुशाच्या पथकाने मुरूड येथून शुक्रवारी दुपारी उचलले. १५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चाैकशीत १८ गुन्ह्यांचा उलगडा झाला. या अट्टल टाेळीने लातूर-धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत धुमाकूळ घातल्याचे अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

लातुरात घरफाेडी, पशुधन चाेरी, गाेदाम फाेडल्याच्या घटना घडल्या. आराेपींच्या अटकेचे आदेश पाेलिस अधीक्षक अमाेल तांबे यांनी दिले. स्थागुशाचे पोनि. सुधाकर बावकर यांच्या पथकाने टाेळीचा माग काढला. खबऱ्याच्या माहितीनुसार मुरूड रेल्वे स्टेशन चौकात सापळा लावला. यावेळी रमेश उद्धव चव्हाण (२६, रा. ढोकी, जि. धाराशिव), शिवाजी लाला काळे (४५, रा. वाटवडा, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगमध्ये ९ लाख २५ हजारांची राेकड आढळली. त्यांनी साथीदारांसाेबत घरफाेड्या, पशुधन चाेरी, कारखान्याचे गनमेटल वस्तू चाेरल्याचे कबूल केले. ही राेकड पशुधन, दागिने विक्रीतून आली. किल्लारी, भादा व बारड (जि. नांदेड) कारखान्यातील गनमेटल वस्तू चाेरून त्या मुक्तार मौला पठाण (४२, रा, मुरूड, जि. लातूर) व बार्शी (जि. साेलापूर) येथील भंगारवाल्याला विक्री केल्याचे सांगितले. मुरूडच्या भंगारवाल्याकडून ६ लाख ५७ हजार ४५६ रुपयांचे भंगार जप्त केले.

ही कारवाई स्थागुशाचे पोनि. सुधाकर बावकर, सपोनि. माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, सर्जेराव जगताप, माधव बिलापट्टे, रामलिंग शिंदे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, तुराब पठाण, गणेश साठे, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, युवराज गिरी, अर्जुनसिंग राजपूत, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, महादेव शिंदे, गोविंद भोसले, शैलेश सुळे, हरी पतंगे, व्यंकटेश निटुरे, प्रदीप चोपणे, श्रीनिवास जांभळे, अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली.

१० ठाण्यांच्या हद्दीत टाेळीकडून १८ गुन्हे...भादा, उदगीर ग्रामीण, कासारशिरशी, चाकूर, देवणी, अहमदपूर, उदगीर शहर, निलंगा, किल्लारी व बारड (जि. नांदेड) या दहा ठाण्यांच्या हद्दीत १८ गुन्हे केल्याचे उघड झाले.

‘त्या’ १२ साथीदारांचा पाेलिस पथकाकडून शाेध...अटकेतील चाेरट्यांनी १२ साथीदारांच्या मदतीने लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यांत घर, गाेदाम फाेडले. टाेळीतील १२ सराईत गुन्हेगारांचा शाेध पाेलिसांकडून घेतला जात आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस