शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

घरमालक मुलाच्या घरी गेले, चोरट्यानं पळवला घरातून १७ लाखांचा ऐवज!

By विलास जळकोटकर | Updated: October 30, 2023 18:39 IST

विजापूर रोडवरील मंत्री चंडक पार्क येथील हुसेनबाशा चाँदसाब शेख (वय- ६३) यांच्या घरात ही चोरी झाली. 

सोलापूर : घरमालक मुलाच्या घरी गेलेले.. बायको अन् सूनही माहेरी गेलेली. जाताना दरवाजा कडेकोट कुलूपानी बंद केला असताना चोरटा मागचा दरवाजा फोडून शिरला आणि कपाटातून तब्बल १२ लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १७ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला. रविवारच्या रात्री ही घटना उघडकीला आली आणि एकच गोंधळ उडाला. विजापूर रोडवरील मंत्री चंडक पार्क येथील हुसेनबाशा चाँदसाब शेख (वय- ६३) यांच्या घरात ही चोरी झाली. 

या प्रकरणी फिर्यादी हुसेनबाशा यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. यात त्यांनी म्हटले आहे की, रविवारी दुपारपासून घरामध्ये कोणीच नव्हते. हुसेनसाब आपल्या मुलाकडे नई जिंदगी येथे गेले होते. पत्नी ही तिच्या माहेरी आणि सुनही तिच्या माहेरी गेली होती. घरी कोणीच नसल्याने जाताना सुनेने मुख्य दरवाजाला कुलूप लावलेले होते. चोरट्याने रात्रीची संधी साधून मागच्या बाजूला किचनचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. 

बेडरुममधील लाकडी कपाटाचे कुलूपही तोडले. आतमध्ये भारतीय चलनाच्या विविध दरांची १२ लाख रुपयांची रोकड सापडली. त्यानंतर त्यानंतर त्याला दागिन्यांचं घबाड सापडलं. असा एकूण १७ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यानं धूम ठोकली. रात्री फिर्यादी हुसेनसाब घरी आल्यानंतर दरवाजा उघडा आणि अस्ताव्यस्त पसरलेले सामान पाहून त्यांना चोरी झाल्याची खात्री झाली. पहाटेच विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला.

काय काय गेले चोरीला?चोरट्याने कपाटातील १२ लाखांची रोकड, ९० हजारांचा सोन्याचा अरबी पट्टा (३ तोळे), ३० हजारांचा राणी हार (२ तोळे), ९० हजारांचे नेकलेस (३ तोळे), ३० हजारांचे कानातील टॉप्स, २४ हजारांच्या दोन अंगठ्या (८ ग्रॅम), ४५ हजारांच्या ५ लेडिज अंगठ्या (१५ ग्रॅम), १.५ लाखांचे २ मंगळसूत्र ( ५ तोळे), ३० हजारांची सोन्याची चेन (१ तोळा), ३० हजाराचे मंगयसूत्र (१ तोळा), ३० हजारांच्या २ कनातील रिंग (१० ग्रॅम), ७ हजारांचे चांदीचे पैंजन (२२ तोळे), ३,५०० रुपयांचे चांदीचे पैंजन (१० तोळे) असा एकूण १७ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारी