शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:48 IST

चारित्र्यावर संशय घेत एका पतीने आपल्या पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत एका पतीने आपल्या पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्या नाक, कान आणि छातीवर अनेक खोलवर वार करण्यात आले आहेत.

३५ वर्षीय सावित्रीबाई मंगळवारी तिच्या माहेरून सासरच्या घरी आली होती. त्यानंतर तिचा पती कमल वर्मा याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात कमलने घरातील चाकू उचलला आणि सावित्रीच्या नाक, कान आणि छातीवर ५-६ वेळा वार केले. या हल्ल्यामुळे सावित्रीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडली.

शेजाऱ्यांनी वाचवले, पती फरारसावित्रीबाईंच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावत त्यांच्या घरी आले, ज्यामुळे आरोपी कमल वर्मा घटनास्थळावरून पळून गेला. शेजाऱ्यांनी तातडीने सावित्रीबाईंना सारंगपूर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी शाजापूर येथे पाठवण्यात आले आहे.

पोलिसांची कारवाईलिमाचौहान पोलीस स्टेशनचे प्रभारी अनिल राहोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाईंच्या तक्रारीवरून आरोपी पती कमल वर्मा विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची विविध पथके आरोपीचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची सखोल पाहणी देखील केली आहे.

लग्नापासूनच संशयाचे भूतसावित्रीबाईंनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, लग्नापासूनच तिचा पती कमल वर्मा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि यावरून त्याने तिला यापूर्वीही अनेक वेळा मारहाण केली होती. या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाचा कळस या जीवघेण्या हल्ल्यात झाला. आरोपी कमल वर्मा सध्या फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश