शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा दात लुकलुकला; अन् १५ वर्षांनी आरोपी जाळ्यात अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:15 IST

रफी किडवाई मार्ग पोलिसांची कामगिरी...

मुंबई : आवड म्हणून लावलेल्या सोन्याच्या दोन दातांमुळेच एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची घटना घडली. रफी किडवाई मार्ग पोलिसांनी १५ वर्षांपासून फरार असलेल्या प्रवीण आशुभा जडेजा ऊर्फ प्रवीणसिंह ऊर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा (३८) याला बेड्या ठोकल्या. तो स्वतःची ओळख लपवून राहत होता. पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्याला विम्याच्या रकमेचे आमिष दाखवून जाळ्यात ओढण्यात आले.

हिंदमाता परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय करणारे तक्रारदार ए. एच. गंगर (४०) यांच्याकडे जडेजा हा १५ वर्षांपूर्वी कामाला होता. अन्य व्यापाऱ्यांकडे उसने असलेली रक्कम गंगर यांनी प्रवीणला आणण्यासाठी पाठविले होते. त्यावेळी मिळालेल्या ४० हजार रुपयांवर त्याने डल्ला मारला. तसेच शौचालयात कोणीतरी रक्कम असलेली पिशवी चोरल्याचा बनाव रचला. याप्रकरणी रफी किडवाई मार्ग पोलिसांनी भादंवि कलम ४०८ अंतर्गत गुन्हा नोंदवत  आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात हजर राहत नव्हता. अखेर दादर येथील न्यायालयाने त्याच्या विरोधात स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला फरार घोषित केले होते. गेल्या १५ वर्षांपासून जडेजा फरार होता. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखडे, पोलिस हवालदार नारायण कदम, सुरेश कडलग, रवींद्र साबळे, महिला पोलिस शिपाई विद्या यादव व पोलिस शिपाई सुशांत बनकर यांनी तपासाला सुरुवात केली. जडेजाबाबत पोलिसांकडे अधिक माहिती नव्हती. फक्त आरोपीचे पुढील दोन दात सोन्याचे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरू केला. 

त्याच्या आडनावावरून तो गुजरातमधील कच्छचा रहिवासी असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी हातातील माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन सुरू केले. अखेर, खबऱ्याकडून सोन्याचे दात, वयोगट, कामधंदा या गोष्टींशी मिळतीजुळती व्यक्ती तेथे असल्याचे निष्पन्न होताच पथकाने सापळा रचला. संशियाताशी संपर्क साधून विम्याचे पैसे घेण्यासाठी मुंबईत बोलावले. पैशासाठी मुंबईत येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. तेव्हा तो प्रवीण असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली. 

नावाची हेराफेरी-विशेष म्हणजे आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी प्रवीणऐवजी प्रदीपसिंह असे नाव बदलले होते. त्याने आणखीन कुणाला फसविले आहे का? याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई