मित्रावर जीवघेणा हल्ला; हातोडीने डोक्यावर केला प्रहार

By कुमार बडदे | Updated: April 4, 2023 17:20 IST2023-04-04T17:20:05+5:302023-04-04T17:20:47+5:30

याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारी करीम आणि त्याच्या साथीदारा विरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The friend attacked the friend's head with a hammer | मित्रावर जीवघेणा हल्ला; हातोडीने डोक्यावर केला प्रहार

मित्रावर जीवघेणा हल्ला; हातोडीने डोक्यावर केला प्रहार

मुंब्रा - मित्राने मित्राच्या डोक्यावर हाथोडीने प्रहार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यची घटना उघडकीस आली आहे. हल्ला केलेला मित्र आणि त्याच्या साथीदारा विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण शहरातील पूर्व भागात रहात असलेला सलमान मुजावर हा २४ वर्षाचा तरुण मुंब्रा शहरातील कौसा परीसरात असलेल्या स्टेडियम समोरुन वाहनातून मित्रासह चालला होता. त्यावेळी करीम मुजावर याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने सलमान याला वाहनामध्ये डांबून प्रथम त्याला मारहाण केली.

अज्ञात कारणावरुन जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या डोक्यार हातोडीने प्रहार केला. यात गंभीर जखमी झालेल्या सलमान याला उपचारासाठी कल्याण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारी करीम आणि त्याच्या साथीदारा विरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The friend attacked the friend's head with a hammer