शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'नीरी'चे माजी संचालक राकेश कुमार अखेर निलंबित! आर्थिक अनियमिततेचा आराेप, CSIR कडून कारवाई

By निशांत वानखेडे | Updated: April 29, 2024 19:49 IST

'नीरी'चे संचालक असताना माेठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे गंभीर आराेप राकेश कुमार यांच्यावर लागले हाेते.

निशांत वानखेडे, नागपूर: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) चे माजी संचालक डाॅ. राकेश कुमार यांना अखेर बरखास्त करण्यात आले आहे. पदाचा दुरुपयाेग करून नातेवाईकांना नीरीमध्ये नाेकरीवर लावणे, बनावट कंपनीला वेतन आणि आर्थिक अनियमिततेच्या आराेपावरून वैज्ञानिक व उद्याेग संशाेधन परिषद (सीएसआयआर) द्वारे अखेर ही कारवाई करण्यात आली.

'नीरी'चे संचालक असताना माेठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे गंभीर आराेप राकेश कुमार यांच्यावर लागले हाेते. याबाबतच्या अनेक तक्रारी सीएसआयआरकडे पाेहचत हाेत्या. या तक्रारींची सीएसआयआरकडून चाैकशी करण्यात आली. अनेक महिने ही चाैकशी चालल्यानंतर त्यात गैरप्रकार झाल्याचे दिसून आले. त्यांनी अनेक संशाेधनांचा माेबदला दिला, जे कधी झालेच नाहीत. कागदावर त्या याेजना तयार करण्यात आल्या व संशाेधनाच्या नावावर खानापुर्ती करण्यात आली. संशाेधनाच्या नावाने बनावट संस्थांना माेबदला देण्यात आला. यात काेट्यवधीची हेरफेर झाल्याचा आराेप झाला व आक्षेपही घेण्यात आला हाेता.दुसऱ्या एका आराेपानुसार नीरीमध्ये अनेक कामांसाठी याेग्यता न पाहता नातेवाईकांना कामे देण्यात आले. डाॅ. कुमार यांनी अनेक पदांची व्हॅकन्सी काढली. त्यानंतर मुलाखतीमध्ये स्वत:चे, दूरचे नातेवाईक व परिचित लाेकांना नाेकरीवर लावले. तक्रारींवर चाैकशी केली असता अनेक आराेप सिद्ध झाल्याने त्यांना सीएसआयआर दिल्ली मुख्यालयी बाेलावण्यात आले. डाॅ. कुमार यांच्याविराेधात नीरीतील कर्मचाऱ्यांनीच नावासकट तक्रारी केल्या हाेत्या. काही दिवसानंतर डाॅ. कुमार निवृत्त हाेणार हाेते पण त्यापूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कॅटमध्ये दिले आव्हान

या कारवाईच्या विराेधात डाॅ. राकेश कुमार यांनी सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल (कॅट) मध्ये आव्हान दिले आहे. कॅटने त्यांच्या अपीलावर सीएसआयआरला उत्तर देण्यासाठी नाेटीस दिली आहे. उत्तर सादर करण्यासाठी ३० एप्रिल २०२४ पर्यंत वेळ देण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर