शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बापानेच एकुलत्या एक मुलास कुऱ्हाडीने ठार मारले, पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 23:18 IST

दारुसाठी पैसे न मिळाल्याने दर्शनसिंहने आपल्याच लहान मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

उत्तर प्रदेशच्या ईटाव्हा जिल्ह्यातील एका खून प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. येथे चक्क वडिलांनी एकुलत्या एक मुलावर कुऱ्हाडीने वार करत त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने जिल्हा हादरला आहे. 

दारुच्या नशेत मुलगा आपल्या नातवंडांना मारहाण करत असल्याचं पाहून आजोबांना संताप अनावर झाला. त्यामुळे, त्याने कुऱ्हाड हाती घेऊन आपल्या एकुलत्या एक मुलाच्या डोक्यात घातली. त्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेतली. येथील ऊसराहार ठाणे परीक्षेत्रातील ताखा पंचायतीच्या मजरा कटैला गावांत मंगळवार पहाटे साडे तीन वाजता राहुल कुमार उर्फ दर्शन सिंह (३०) दारुच्या नशेत स्वत:च्याच घरी गोंधळ घालत होता. 

दारुसाठी पैसे न मिळाल्याने दर्शनसिंहने आपल्याच लहान मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुलाचे हे वर्तन पाहून त्याचे वडिल लक्ष्मीनारायण यांना संताप अनावर झाला. त्यावेळी, मुलाच्या हातातील कुऱ्हाड घेऊन त्यांनी मुलाच्या अंगावर उगारली. मुलाच्या मानेवरच कुऱ्हाडीचे घाव झाल्याने मुलगा जागीच मृत्यू पावला. त्यानंतर, भयभीत झालेल्या लक्ष्मीनारायण यांनी घरापासून ५० मिटर दूरवर कुऱ्हाड शेतात लपवून ठेवली. तर, रक्ताने माखलेले कपडे जवळील एका विहिरीत टाकले. 

सकाळी या घटनेची माहिती मिळताच ग्रामसेविका राजेश्वरी देवी यांच्या मुलाने पोलिसांनी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून कुऱ्हाडीसह कपडेही जप्त केले आहेत. याप्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली असून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसetawah-pcइटावा