शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ८ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन बापानेच केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 20:35 IST

पहूर : आशा वर्करमुळे उघडकीस आला प्रकार

पहूर (जि. जळगाव) : आधी दोन मुली त्यात तिसरीही मुलगी झाल्याने बापानेच आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन तिची हत्या केली. एवढेच नाही मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. आशा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि बापाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार हरिनगर तांडा, ता. जामनेर येथे रविवारी घडला.

गोकुळ गोटीराम जाधव (३०) असे या नराधम बापाचे नाव आहे. आरोग्य विभागच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, वाकोदजवळ हरिनगर तांडा (ता. जामनेर) येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. शनिवार, दि. २ सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आली. रविवार, १० रोजी चिमुरडीची गोकुळने हत्या केली.  आशा सेविका या नवजात अर्भकांच्या जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या, त्यावेळी चिमुरडी तिथे नव्हती. आशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी मंगळवारी गावात पोहाेचले. त्यांना सुरुवातीला चिमुरडीच्या आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. कुमावत यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने चिमुरडीला मारल्याची कबुली दिली. गोकुळने रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिली. तिला झोळीत झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. रात्री चिमुरडीचा मृतदेह फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. रात्री उशिरापर्यंत गोकुळ जाधवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस