शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बापच खूनी! मुलाच्या शरीराचे ग्राइंडरने केले तुकडे, नंतर कचऱ्याच्या पॉलिथिनमधून फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 17:00 IST

Murder case : शरीराचे छोटे तुकडे काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून अवयव वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

गुजरातमधील अहमदाबादमधील वासणा परिसरात शिर, हात आणि पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेच्या 5 दिवसांनंतर वासणापासून 3 किमी अंतरावरील एलिसब्रिज परिसरातून कापलेले पाय सापडले. या घटनेबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. हा मृतदेह हितेश नावाच्या २१ वर्षीय तरुणाचा असून त्याच्या वृद्ध वडिलांनीच त्याची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी पित्याने ग्राइंडरने मुलाच्या शरीराचे छोटे तुकडे केले. त्यानंतर शरीराचे छोटे तुकडे काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून अवयव वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.मिळालेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी अहमदाबादमध्ये हात, पाय आणि शिर कापलेला मृतदेह सापडला होता. तरुणाची हत्या त्याच्या वडिलांनीच केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला दारू आणि ड्रग्जचे व्यसन होते. सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होताअहमदाबाद क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या हत्येनंतर आरोपी वडील सुरतला गेले होते. सुरतहून गोरखपूरला अवध एक्स्प्रेसने जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अटक करण्यात आली. गोरखपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर आरोपींना तेथून नेपाळला पळून जायचे होते.मुलाला दारूचे व्यसन होतेआरोपीने पोलिसांना सांगितले की, गेल्या 5-6 वर्षांपासून त्याचा मुलगा दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेला होता, त्या दिवशीही तो दारू पिऊन पैशाची मागणी करत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर वडिलांनी घरात ठेवलेल्या दगडाने त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झाला. ग्राइंडर मशीनने केले तुकडेमुलाच्या मृत्यूनंतर आरोपी वडील अहमदाबादच्या कालुपूर मार्केटमध्ये गेले, तेथून ग्राइंडर मशीन आणली. यानंतर त्यांनी मुलाच्या शरीराचे छोटे तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे कचऱ्याच्या काळ्या पॉलिथिनमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले.आतापर्यंत मृतदेह आणि पाय पोलिसांनी जप्त केले आहेत. चौकशीत अमली पदार्थाच्या सवयीमुळे वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसahmedabadअहमदाबादArrestअटकNepalनेपाळ