शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आठ ते दहा दिवसांपासून गायब असलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 19:26 IST

Deadbody Found : हंडरगुळी येथील घटना : सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील एक तरुण मागील आठ ते दहा दिवसांपासून गायब होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हाळी हंडरगुळी परिसरातील तिरु मध्यम प्रकल्पात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत वाढवणा (बु.) पाेलीस ठाण्यात मंगळवारी सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, गणेश पांडुरंग दापके (२७ रा. हंडरगुळी) हा तरुण बेपत्ता झाला हाेता. तर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आठ ते दहा दिवसांपसून सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर १ फेब्रुवारी रोजी वाढवणा पाेलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली हाेती. त्यानुसार पाेलिसांनी तपासला प्रारंभ केला. तक्रारदार वडिलांचा जबाब पाेलिसांनी नाेंदविला. तक्रारीत दिलेल्या जाबाबत म्हटले आहे, आराेपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून गणेश दापके याच्यासोबत मागील भांडण्याच्या तक्रारीवरून जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करुन, त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तिरू प्रकल्पात टाकला.

याबाबत पांडुरंग बाजीराव दापके (६५ रा. हंडरगुळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजय शिवाजी हंगरगे, बालाजी शिवाजी हंगरगे, सुभाष गोविंद हंगरगे, संतोष गोविंद हंगरगे, त्र्यंबक दिगंबर घोगरे (सर्व रा. हंडरगुळी ता. उदगीर) आणि विजय हंगरगे याचा साडू बाळू (रा. घोणसी ता.जळकोट) यांच्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : नशीब बलवत्तर! लाॅन्चमधून समुद्रात प्रवासी पडला, पोहता येत असल्याने वाचला जीव    

रविवारी हाेता तरुणाचा विवाह...

मयत गणेश दापके या तरुणाचा रविवार, ६ फेब्रुवारी राेजी नियाेजित विवाह साेहळा हाेता. मात्र, त्यापूर्वीच ताे अचानक गायब झाल्याने त्याचे कुटुंबीय हादरुन गेले हाेते. दरम्यान, त्याचा सर्वत्र शाेध घेण्यात आला असता, ताे आढळून आला नाही. अखेर साेमवारी सायंकाळच्या सुमारास तिरु मध्यम प्रकल्पात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा खून असावा, असा संशय त्याच्या कुटुंबियाने घेतला आहे. त्यानुसार पाेलीस तपास करत असून, एकाला ताब्यात घेतले आहे.  - नाैशाद पठाण, सहायक पाेलीस निरीक्षक

टॅग्स :Missingबेपत्ता होणंlaturलातूरPoliceपोलिसDeathमृत्यू