ठेकेदारांनी घातला शासनाला कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 07:23 AM2023-01-20T07:23:23+5:302023-01-20T07:23:48+5:30

बनावट चाचणी अहवाल सादर करून सुमारे एक कोटी २० लाखांना फसवलं

The contractors have defrauded the government of crores | ठेकेदारांनी घातला शासनाला कोटींचा गंडा

ठेकेदारांनी घातला शासनाला कोटींचा गंडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

शहापूर: तालुक्यातील विविध २० गावांमध्ये विहीर बांधणे व दुरुस्ती करणे आदी कामांची देयके काढण्यासाठी बनावट चाचणी अहवाल सादर करून सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सरपंचांसह सहा ठेकेदारविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

सिद्धी देशमुख (शहापूर), मनीष भेरे, प्रीतम भेरे (रा. वासिंद), गणेश कृपा कन्स्ट्रक्शन (मुरबाड), बुधरानी धर्मु इंदनदास (उल्हासनगर), तालुक्यातील अघई ग्रामपंचायतीचे सरपंच अशा सहा ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील २०१६ ते १८ दरम्यान शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व देखभाल दुरुस्ती निधी या योजनांमधून संबंधित ठेकेदारांना तालुक्यातील एकूण २० गावांमध्ये साधी विहीर बांधणे व दुरुस्ती करणे, अशी कामे होती.

या कामांची एक कोटी १९ लाखांची देयके प्राप्त करण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी २०१७ मध्ये शासकीय तंत्र निकेतन बांद्रा, मुंबई येथील त्रयस्थ चाचणी अहवाल शासनास सादर केला होता. शासनाने अहवालाची पडताळणी केली असता शासकीय तंत्र निकेतन बांद्रा मुंबई यांनी २०१५ पासून त्रयस्थ चाचणी अहवाल बंद केल्याचे निष्पन्न झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील २० कामांचे देयक मिळविण्यासाठी बनावट चाचणी अहवाल सादर करून शासनाची फसवणूक केली. ठाणे जिल्हा परिषदेचे उपअभियंता यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The contractors have defrauded the government of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.