शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात येथून चोरीला गेलेल्या मोबाईल चोरी प्रकरणाचे कनेक्शन गोव्यातही

By सूरज.नाईकपवार | Updated: April 11, 2024 17:23 IST

मडगावातून एक मोबाईल केला जप्त

सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गुजरातील सूरत येथील मोबाईल चोरी प्रकरणाचे कनेक्शन गोव्यातही असल्याचे उघड झाले असून, मडगावात एका नामंकीत मोबाईल विक्री दुकानातून या चोरीचा एक मोबाईल विकला गेला होता असे तपासात आढळून आले आहे. तेथील पोलिस गोव्यात दाखल झाले असून, त्यांनी तो मोबाईल हस्तगस्त केला आहे. या एकंदर घटनेमुळे ते मोबाईल विक्री दुकानानही संशऱ्याच्या घेऱ्यात सापडले आहे.

एका वर्षापुर्वी चाेरीची वरील घटना घडली होती. १५ मोबाईल चोरीला गेले होते. गुजरातातील सूरत येथील अमरोली पोलिस ठाण्यात यासंबधी तक्रारही दाखल करण्यात आली होती. भादंसंच्या ४२० कलमाखाली तेथील पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते. एकंदर १० लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरीला गेले होते.पोलिस तपासात याचे कनेक्शन गोव्यातही आढळले. तेथील पोलिस गोव्यात दाखल झाले व ज्यांनी हा मोबाईल विकत घेतला होता, त्याच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेसबंधी माहितीही दिली. त्या ग्राहकाकडे मोबाईल खरेदी केल्याची कागदपत्रेही आहे. तुर्त पोलिसांनी पुढील तपासासाठी हा माेबाईल जप्त केला आहे.

दरम्यान त्या खरेदीदाराने आता मडगाव पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदविली आहे. यासंबधी मडगाव पोलिसांकडे संपर्क साधला असता, त्यावर अधिक माहिती देण्यास इन्कार करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी