शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लातुरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी; ८ लाखांचा साठा जप्त, ५७ जणांना अटक 

By राजकुमार जोंधळे | Updated: October 17, 2023 19:46 IST

यावेळी एकूण चारचाकी, चार दुचाकीसह ७ लाख २३ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतील गावामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू, हातभट्टी अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या. ही कारवाई लातूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली आहे. याबाबत ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५७ जणांना अटक केली आहे. यावेळी एकूण चारचाकी, चार दुचाकीसह ७ लाख २३ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये माेठ्या प्रमाणावर हातभट्टी, अवैध देशी-विदेशी दारू विक्री केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लातूर जिल्हा अधीक्षक केशव राऊत यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या अवैध दारूविक्रीविराेधात धडक माेहीम हाेती घेतली. यासाठी लातूर आणि उदगीर येथील पथकांची नियुक्ती करण्यात आली हाेती. या पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईत ५६ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५७ जणांना अटक केली आहे. यावेळी ४४१ लिटर देशी दारू, २७ लिटर विदेशी दारू, २ हजार ४५ लिटर हातभट्टी आणि ३ हजार २५० लिटर रसायन, चार चारचाकी आणि चार दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

लातूर, उदगीर येथील पथकाची संयुक्त कारवाई...ही कारवाई लातूर विभागाचे निरीक्षक आर. एस. काेतवाल, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, ए. के. शिंदे, स्वप्निल काळे, ए. बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, नीलेश गुणाले, मंगेश खारकर तसेच जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, एस. जी. बागेलवाड, संताेष केंद्रे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके, विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी