शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या 1 महिन्यानंतरच सासरी नववधूचा जळालेला मृतदेह आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 20:42 IST

Dowry Case :5 दिवसांपूर्वी कोटा पोलिसांना आगीमुळे घरातील नवविवाहित महिला जळून खाक झाल्याची माहिती मिळाली होती.

बिलासपूर : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील कोटा गावातील कारगीकला येथे एका नवविवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ केल्याची घटना समोर आली आहे. हुंड्याची मागणी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्यांसह अन्य ३ जणांना अटक केली आहे. एका महिन्यापूर्वी नगीता उर्फ ​​श्वेता साहू हिचे लग्न झाले होते. लग्नानंतर मोटारसायकल दिली नाही म्हणून सासरचे लोक तिला फटकारायचे. 5 दिवसांपूर्वी कोटा पोलिसांना आगीमुळे घरातील नवविवाहित महिला जळून खाक झाल्याची माहिती मिळाली होती.

या प्रकरणी माहेरच्या लोकांनी श्वेताच्या हत्येचा आरोप केला. घटनास्थळी पोहोचलेल्या कोटा पोलिसांनी श्वेताचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह घरातून बाहेर काढला. यासोबत रॉकेल तेल आणि माचिसही जप्त करून कारवाई सुरू करण्यात आली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. एएसपी ग्रामीण रोहित झा आणि कोटा स्टेशन प्रभारी दिनेश चंद्र यांना एसएसपी पारुल माथूर यांनी तपास करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. चौकशीअंती समोर आले की, लग्नानंतर मोटारसायकल आणली नाही म्हणून तिचा पती, सासू आणि घरातील इतर लोक तिला सतत त्रास देत होते.

नवरा नवरी थोडक्यात बचावले, लग्नादरम्यान बाल्कनी कोसळल्याने झाले 12 जण जखमीटोमणे मारत होते रोजच्या टोमणेला कंटाळून नगीता उर्फ ​​श्वेताने घरात ठेवलेले रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेच्या तपासात आत्तापर्यंत कोटा पोलीस ठाण्यात मृताचा पती नोहर साहू, सासरा लेधू राम, सासू सतीनीबाई आणि अन्य दोघांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मृतकाच्या माहेरच्या मंडळींसह सासरच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

 

टॅग्स :dowryहुंडाPoliceपोलिसChhattisgarhछत्तीसगडArrestअटकDeathमृत्यू