शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये तरुणीचा रक्तबंबाळ अवस्थेत सापडला मृतदेह; बहिणींना प्रियकरावर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 13:35 IST

Murder Case : शिवम नावाच्या त्याच्या एका मित्राने ही हत्या करून तेथून त्याने पळ काढल्याचा आरोप आहे.

राजधानी दिल्लीच्या दक्षिण पश्चिम भागात हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. महिपालपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला. रिपोर्टनुसार, मुलीचे नाव सोनिया (नाव बदलले आहे) असल्याचे सांगण्यात येत आहे.

27 फेब्रुवारी रोजी व्हीके दक्षिण पोलिसांना महिपालपूर येथील लक रेसिडेन्सी हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. हॉटेलच्या खोलीत घुसून सोनियाची हत्या करण्यात आली आहे. शिवम नावाच्या त्याच्या एका मित्राने ही हत्या करून तेथून त्याने पळ काढल्याचा आरोप आहे.हत्येची माहिती मिळताच डीसीपी दक्षिण पश्चिम घटनास्थळी पोहोचले. सोनिया (नाव बदलले आहे) असे मृत महिलेचे नाव आहे.गाझियाबादचा रहिवासी शिवम चौहान आणि तरुणी गेल्या चार वर्षांपासून मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे. शिवमने 25 फेब्रुवारीला ती खोली बुक केली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघेही लग्न करणार होते. त्यामुळे घरच्यांना सांगून ती अनेकदा प्रियकरासह १ ते २ दिवस घराबाहेर पडली. मृताच्या बहिणींचे म्हणणे आहे की, मृत तरुणी नेहमी तिच्या प्रियकरासोबत लग्नाबाबत बोलायची आणि शिवम हे टाळत असे.हॉटेलमध्ये झडती घेत असताना पोलिसांना दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. गुन्हे शाखेच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सफदरजंग रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असून पथके आरोपीला शोधण्यासाठी तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhotelहॉटेलdelhiदिल्ली