शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

चिमुकलीवर अत्याचार करुन खून करणाऱ्यास फाशी; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल

By संजय पाटील | Updated: July 21, 2023 15:11 IST

पीडितेच्या कुटुंबाला दीड वर्षात न्याय

कऱ्हाड: आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तीचा खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कºहाडच्या विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा ठोठावली.

संतोष चंद्रू थोरात (वय ४१, रा. रूवले, ता. पाटण) असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद आणि ढेबेवाडी पोलिसांनी पुराव्यासह सादर केलेले दोषारोपपत्र ग्राह्य मानून न्यायालयाने हा निकाल दिला. पश्चिम महाराष्ट्रात गत चाळीस वर्षात प्रथमच न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष थोरात हा २९ डिसेंबर २०२१ रोजी एका अल्पवयीन मुलीला व तिच्या मैत्रिणीला शेतात घेऊन गेला होता. शेतातून परत आल्यावर त्या दोन्ही मुली आरोपी थोरात याच्या घराबाहेर खेळत होत्या. काही वेळानंतर पीडित मुलीची मैत्रिण घरी निघून गेली. पीडित आठ वर्षीय मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत रुवले गावातील निर्जनस्थळी नेले. तिच्यावर तिथे अत्याचार करत तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह दरीत फेकून दिला. हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र शहा यांनी युक्तिवाद केला.पश्चिम महाराष्ट्रात गत अनेक वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा लागल्याने जनतेचा बाललैंगिक अत्याचार कायदा आणि न्यायालयावरचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे मत सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी यावेळी सांगीतले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस