शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील तिहेरी हत्याकांडातील आरोपीबाबतचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, लवकरच अटक होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 22:31 IST

Crime News: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांची एकाच वेळी हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या तिहेरी हत्याकांडातील आरोपीबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांची एकाच वेळी हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या तिहेरी हत्याकांडातील आरोपीबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपीने चोरलेली पेटी विहिरीत सापडली असून, लवकरच पोलीस खुन्याला जेरबंद करतील असा अंदाज व्यक्त होत आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली वणौशी  तर्फे नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांची एकाच वेळी हत्या झाली होती. तिहेरी हत्याकांडामध्ये सत्यवती पाटणे-75, पार्वती पाटणे- 90 व इंदुबाई पाटणे 85 या तीन महिलांचा मुत्यू झाला होता. खून नेमका कशामुळे झाला याचा पोलिसांनी कसून तपास केला असता घरातील दागिने गायब असल्याचे तपासादरम्यान आढळून आले, त्यामुळे चोरीच्या उद्देशाने खून झाला असावा असा संशय पोलिसांना आला होता.  त्यावरून तपासाची चक्रे फिरवली गेली असता पोलिसांच्या हाती काही धागेदोरे सापडले असून खोतवाडी च्या शेजारीच असणाऱ्या विहिरीमध्ये सत्यवती पाटणे यांची पेटी आढळून आली आहे.  त्यामुळे संशयित आरोपीने या पेटीतील मुद्देमाल काढून घेऊन ही पेटी विहिरीत फेकली असण्याचा संशय पोलिसांना आला असून,  या विहिरीत नेमकं अजून काय आहे. याचा तपास पोलिस करीत आहेत.

तसेच जवळच असणार्‍या जंगलात अजून काही पुरावे हाती लागतात का याचा पोलीस गेले चार दिवस तपास करीत आहेत.  १४ जानेवारी पासून या ठिकाणी डीवायएसपी शशी किरण काशीद, जयश्री देसाई अप्पर पोलीस अधीक्षक, दापोली पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, ठाण मांडून आहेत.

तिहेरी हत्याकांडचा हत्यारा  पोलिसांच्या हाती लागत नव्हता.  डॉग स्कॉडच्या मदतीने गुन्हेगाराचा शोध सुरू होता.  मात्र गुन्हेगाराने कोणताही पुरावा सोडला नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत.  परंतु त्या विहिरीत पाण्यावर औषध गोळ्याचे काही पॉकेट तरंगताना पोलिसांच्या निदर्शनास पडले. त्यावरून औषध गोळ्या ची पाकिटे बाहेर काढून पाहिले असता अलिकडची तारीख असलेल्या या गोळ्याचे पाकीट कोणी टाकले असावे यावरून संशय आला असता  पाण्यात एक पेटी पोलिसांच्या हाती लागली आहे.  त्यामुळे आरोपीने यातील मुद्देमाल काढून घेऊन ही पेटी विहिरी मध्ये टाकली असावी या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

सत्यवती पाटणे या सावकारी पैसे देत असल्याचे स्थानिकाकडून चर्चिले जात असून,  या पैशाच्या देवाणघेवाणीतून खून झाला की काय अशी चर्चा सुद्धा पंचक्रोशीत सुरू आहे.  तसेच ती पेटी गायब झाल्याने व त्या तीनही वृद्ध महिलांच्या अंगावरील दागिने गायब असल्याने खून हा चोरीसाठीच झाला असावा असाच संशय पोलिसांनी यापूर्वीच व्यक्त केला होता.  परंतु आता पोलिसांच्या हाती सबळ पुरावा लागल्याने फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट नंतर संशयित त्यानेच हा गुन्हा केलाय का हे सिद्ध होणार आहे. परंतु सध्या तरी पोलीस सबळ पूराव्यापर्यंत पोहोचल्याने तिहेरी हत्याकांडातील तो नराधम पोलिसांच्या तावडीत सापडण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी