शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

अपहरण झालेली मुलगी सापडली, १२ तासांच्या आत वाडा पोलिसांनी केली सुरक्षित सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 13:22 IST

वाडा तालुक्यातील ऐनशेत गावाशेजारी असणाऱ्या शेत घरात ही मुलगी सापडली असून पोलिसांनी एका आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

वाडा/कुडूस : वाडा शहरातील अशोकवन भागातील  सोसायटीतील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचे (वय ११) अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ६.०० च्या सुमारास घडली होती. या घटनेचा तपास वाडा पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत लावल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तातडीने मुलीची सुरक्षित सुटका करणाऱ्या वाडा पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.वाडा तालुक्यातील ऐनशेत गावाशेजारी असणाऱ्या शेत घरात ही मुलगी सापडली असून पोलिसांनी एका आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिसांनी यावेळी एक कार सुद्धा जप्त केली असून समीर श्याम ठाकरे  (वय ३०, रा. ऐनशेत) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेबाबत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी सकाळी वाडा पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. उर्वरित आरोपीही लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ही मुलगी वाडा येथील पी. जे. हायस्कूलमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत असून शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ती आपल्या दोन मैत्रिणींसोबत घरी येत होती. तिच्या मैत्रिणी घरी गेल्यानंतर ही मुलगी अशोक वनातील बिल्डिंगमधील तिच्या घरी जात असताना सायंकाळी ६ च्या सुमारास बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी तिचे तोंड दाबून धरले आणि त्यांच्या कारमध्ये घालून  मुलीला घेऊन पसार झाले होते. या दरम्यान मुलगी जोरात ओरडल्याने काहीतरी विपरीत घडल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले, मात्र तोपर्यंत अपहरणकर्ते मुलीला घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी वाडा पोलिसांनी रात्रभर तपास करून शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, या फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाची संशयास्पद कार आढळून आली. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन तपास करीत आरोपींना १२ तासांच्या आत अटक केली. मुलीची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुरक्षित सुटका  केल्याबद्दल पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाडा पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या पथकाने यशस्वी तपास केला.

यांनी केला तपासपोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरीक्षक दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली स. पो. निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या पथकाने तपास केला.

सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपासवाडा पोलिसांनी रात्रभर तपास करून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, या फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाची संशयास्पद कार आढळून आली. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन तपास करीत आरोपींना १२ तासांच्या आत अटक केली. मुलीची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुरक्षित सुटका  केल्याबद्दल पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाडा पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी