शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 14:05 IST

संतापाचा उद्रेक व्हावा अशी एक घटना समोर आली आहे. एका १० महिन्यांच्या चिमुकलीवर शेजाऱ्याने घरी नेऊन बलात्कार केला. चिमुकल्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आजी धावत गेली, तेव्हा हा प्रकार समोर आला. 

Heinous Crime : दहा महिन्याच्या चिमुकलीसोबत एका ३० वर्षीय नराधमाने राक्षसी कृत्य केले. चिमुकली अंगणात खेळत होती. तेव्हा आरोपी तिला त्याच्या घरी घेऊन गेला. आरोपीने तिच्या अत्याचार केला. चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिची आजी आरोपीच्या घराकडे गेली, तेव्हा आरोपी अत्याचार करत असल्याचे दिसले. 

चिमुकलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीलाही अटक केले आहे. 

३० वर्षाच्या आरोपीचा १० महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार, घटना काय?

पोलिसांनी ज्याला अटक केली, त्या आरोपीचे नाव दीपक कुमार लालबाबू असे आहे. आरोपीचे पीडित चिमुकलीच्या घरी येणं-जाणं होतं. तो चिमुकलीसोबत खेळायचा. पीडितेची आई रेस्टॉरंटमध्ये काम करते. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२२ सप्टेंबर) चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपी आला आणि त्याने चिमुकलीला उचलून घेतले. त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला आणि अत्याचार केला.

चिमुकली रडायल्या आजी गेली धावून

आरोपी चिमुकलीला घेऊन गेल्यानंतर थोड्या वेळाने तिच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर तिच्या आजीने शोध घेणे सुरू केले. त्यानंतर आजी आरोपीच्या घरात गेली, तेव्हा ती रक्तबंबाळ झालेली होती. तिचा बाजूला आरोपी उभा होता. 

त्यानंतर चिमुकलीच्या आजीने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांना काय घडले हे कळले. ग्रामस्थांनी आरोपीला पकडले आणि बदडले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

चिमुकलीला आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलीस तपास करत आहे चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती डीएसपी कुशल ओझा यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिस