शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

पती 4 वर्षांपासून शोधत होता आपली 'सीमा', प्रियकरासोबत 'सना'ला पाहून बसला धक्का! पोलीसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 23:18 IST

ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आहे. संबंधित महिला 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून रेल्वेने येत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी या महिलेचा बराच शोध घेतला. पण ती सापडली नाही.

ठाणे- येथे एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील बेपत्ता झालेली एक महिला तब्बल 4 वर्षांनंतर सापडली. यानंतर, जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा संबंधित महिलेच्या कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला. कारण, ती महिला तिच्या प्रियकरासोबत फरार झाली होती. (Thane woman missing from train found after 4 years)

ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आहे. संबंधित महिला 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून रेल्वेने येत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी या महिलेचा बराच शोध घेतला. पण ती सापडली नाही. यानंतर, जेव्हा 4 वर्षांनी तिचा पत्ता मिळाला आणि संपूर्ण प्रकरण तिच्या कुटुंबीयांना समजले, तेव्हा त्यांना मोठा हादराच बसला. ही महिला आपल्या प्रियकरासोबत तब्बल चार वर्षांपासून राहत असलेले तिच्या कुटुंबीयांना समजले. 

असे आहे संपूर्ण प्रकरण -सांगण्यात येते, की ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील एका कंपनीत शाहबाज शेख आणि सीमा कोष्टी सोबतच काम करत होते. अंबरनाथमध्ये राहणारी सीमा 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून म्हणजेच मनमाडवरून रेल्वेने येत असतानाच अचानकच बेपत्ता झाली. यानंतर तिच्या नातलगांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मनमाड पोलीस ठाण्यात दिली.

याचदरम्यान कल्याणमध्ये राहणारा शहबाज शेख देखील बेपत्ता झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाहबाज शेख आणि त्याच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवली. अखेर चार वर्षांनंतर पोलिसांना माहिती मिळाली, की कल्याण येथे राहणाऱ्या शाहबाज शेखच्या  काकांचा मृत्यू झाला आहे आणि शाहबाज शेख अपली पत्नी सनासह कल्याणमध्ये आला आहे. 

माहिती मिळताच पोलीस थेट शाहबाज शेखच्या घरी पोहोचले. यानंतर त्यांनी शाहबाजची पत्नी सनाची चौकशी केली. यावर, आपण सना नसून सिमाच आहोत, अशी कबुली तिने दिली. तिने सांगितले, की मनमाडवरून फरार झाल्यानंतर तिने शाहबाजसोबत लग्न केले आणि सीमाची सना झाली. सध्या प्रशासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली  पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणेkalyanकल्याण