शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलिसांनी १४ लाखांचे मोबाईल केले हस्तगत; गुन्हे शाखेस मोठे यश

By अजित मांडके | Updated: August 24, 2022 16:25 IST

ठाणे पोलिसांनी तब्बल १४ लाखांचे मोबाईल हस्तगत केले आहेत.

ठाणे : ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापुर परिसरातून चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेले १४ लाखांचे ७० मोबाईल हस्तगत करण्यात ठाणे शहर पोलीस दलातील खंडणी विरोधी पथक, व मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष यांना यश आले आहे. ज्या नागरीकांचे फोन चोरीस किंवा गहाळ झाले असतील त्यांनी पोलिसांच्या वेबसाईटवर किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरीला जाणे गहाळ होणे असे प्रकार वाढले होते. शहर पोलीस गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी याबाबत आढावा बैठक घेत, त्या मोबाईलचा व आरोपींचा शोध घेण्याबाबत विशेष मोहिम राबवण्याचे आदेश खंडणी विरोधी पथक व मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षेला दिले होते. यासाठी दोन विशेष पथकांची नेमणूक करून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईलचे त्यांच्या आयएमईआय नंबरवरून तसेच दुरसंचार विभाग, भारत सरकारकडून, चोरीस गेलेले व गहाळ झालेल्या मोबाईलबाबत असलेल्या वेबसाईटच्या मदतीने खंडणी विरोधी पथकाने १२ लाख ४० हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण ५५ मोबाईल जप्त केले आहेत. 

७० मोबाईल केले हस्तगत तसेच मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षेने एकूण १ लाख ५० हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण १५ मोबाईल असे एकूण १३ लाख ९० हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण ७० मोबाईल हस्तगत केले आहेत. ही कामिगरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान सोनवणो आदींसह इतर पथकाने केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिसMobileमोबाइल