शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंग खंडणी प्रकरणी ठाणे पोलिसांनी केली दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 22:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: यूएलसी घोटाळ्यातील आरोपीवर मकोकाची कारवाई करण्याची धमकी देत त्याचे पुतणे शरद अग्रवाल यांच्याकडून चार कोटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: यूएलसी घोटाळ्यातील आरोपीवर मकोकाची कारवाई करण्याची धमकी देत त्याचे पुतणे शरद अग्रवाल यांच्याकडून चार कोटी ६८ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आरोपींपैकी संजय पुनमिया आणि संजय जैन या दोघांना कोपरी पोलिसांनी शुक्रवारी मुंबईतून  अटक केली आहे. त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.परमबीर सिंग यांच्याविरोधात २३ जुलै रोजी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा हा गुन्हा दाखल झाला आहे. शरद अग्रवाल यांच्याकडून 2 कोटींची खंडणी आणि 2 कोटी 68 लाख रुपये किमतीची जमीन बळकावल्याचा आरोप सिंग यांच्यावर  असून याप्रकरणी  कलम 384, 385, 388, 389, 420, 364 ए, 34, 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्या व्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि पराग मनेरे यांचीही नावे या गुन्ह्यात सहआरोपी म्हणून आहेत.

या गुन्ह्यातील तक्रारदार शरद अग्रवाल यांनी कोपरी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, परमबीर हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असतांना त्यांनी  आणि तत्कालीन उपायुक्त  पराग मनेरे यांनी मोक्काच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 2 कोटींची रोख खंडणी वसूल केली होती. तसेच 2 कोटी 68 लाख रुपयांचा एक भूखंड देखील बळकावला होता. हा प्रकार नोव्हेंम्बर 2016 ते मे 2018 या काळात घडल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

हा सारा घटनाक्रम कोपरी येथील पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी  घडला होता.  दरम्यान, या घटनेतील आरोपी संजय पुनमिया आणि सुनील जैन या दोघांनाही शुक्रवारी कोपरी पोलिसांनी मुंबईतून अटक केली. अटकेतल्या दोघांना शनिवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना 12 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगCrime Newsगुन्हेगारी