शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Thane News: ठाण्यातील बेपत्ता कारागृह कर्मचारी परतला घरी, समोर आलं बेपत्ता होण्यामागचं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 22:25 IST

Thane Crime News: जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरातून गेली चार दिवस अचानक बेपत्ता झालेला कारागृह शिपाई अशोक पल्लेवाड (३०, रा. कल्याण) हा त्याच्या कल्याणच्या घरी बुधवारी पहाटे परतला. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठाणे - जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरातून गेली चार दिवस अचानक बेपत्ता झालेला कारागृह शिपाई अशोक पल्लेवाड (३०, रा. कल्याण) हा त्याच्या कल्याणच्या घरी बुधवारी पहाटे परतला. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. थेट कारागृह अधीक्षकांवर गैरव्यवहाराचे आरोप केल्याने त्याच्या घातपाताची भीती समाजमाध्यमांद्वारे एका कैद्याने व्यक्त केली होती.

कारागृहात पल्लेवाड हे कार्यरत असून ते २१ मे २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कारागृह परिसरातून अचानक बेपत्ता झाले. कल्याण पूर्व तिसगाव अयोध्या नगरी भागात राहणारे आपले पती अशोक हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी ममता पल्लेवाड यांनी २२ मे २०२२ रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. एकीकडे त्यांचा शोध सुरू असतानाच ते २५ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कल्याण येथील घरी सुखरुप परतले. त्यानंतर त्यांनी स्वत: ठाणेनगर पोलीस ठाण्यात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास येऊन आपली मानसिक स्थिती बरी नसल्याने घर सोडल्याची माहिती दिली.

ठाणे कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांच्याकडून होत असलेल्या मानसिक जाचाला कंटाळल्यामुळे आपण एका मित्राकडे गेल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. शनिवारी रेल्वेने मनमाड गाठले. त्यानंतर भानावर आल्यावर पत्नीला फोन केला आणि घरी परतल्याची माहिती त्यांनी चौकशीत ठाणेनगर पोलिसांना दिली. तक्रार केल्याने एकटे पाडतातआपण वरिष्ठांच्या त्रासामुळेच बाहेर पडलो. अधीक्षक अहिरराव हे मेमो काढतात. तक्रार केली तर एकटे पाडतात. यातच भान न राहिल्याने मनमाडला गेल्याचे पल्लेवाड यांनी सांगितल्याचे पोलीस निरीक्षक विद्या पाटील म्हणाल्या.

कैद्याने केला खुनाचा आरोपयाच कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या एका कैद्याने मात्र कारागृह अधीक्षक अहिरराव यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारागृह शिपाई पल्लेवाड यांनी आवाज उठविल्याने त्यांचा खून अहिरराव यांनी केल्याचा संशय व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली. या कैद्याने ही पोस्ट फेसबुकवर टाकून पल्लेवाड बेपत्ता असल्याची तक्रार व्हायरल केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.

गुन्हेगारांच्या संपर्कात राहून त्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली अशोक पल्लेवाड यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई सुरू आहे. त्यामुळेच ते सध्या वारंवार गैरहजर राहतात. तळोजा कारागृहातही एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २१ मे पासून ते विनापरवानगी गैरहजर आहेत. जर कोणाच्याही भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार असेल तर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करावी. समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करणे चुकीचे आहे." - हर्षद अहिरराव, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे.

टॅग्स :PoliceपोलिसthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी