ठाणे: बाईकवरून आलेल्या टोळक्याचा कारवर गोळीबार

By अजित मांडके | Updated: September 17, 2022 20:25 IST2022-09-17T20:25:14+5:302022-09-17T20:25:42+5:30

सुदैवाने जीवितहानी नाही

Thane gang on a two wheeler bike fired at a car | ठाणे: बाईकवरून आलेल्या टोळक्याचा कारवर गोळीबार

ठाणे: बाईकवरून आलेल्या टोळक्याचा कारवर गोळीबार

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गोल्डन डाईज नाक्यावर घोडबंदर रोड भागात राहणारे गणेश कोकाटे शनिवारी पहाटे आपल्या कारने येत होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या ४ ते ५ जणांच्या टोळक्याने त्यांची कार अडवली. त्यानंतर कारच्या दिशेने गोळीबार केला सुदैवाने यात कोणालाही दुखावत झाली नाही या घटनेनंतर ही टोळकी तेथून पसार झाली. या प्रकरणीची तळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोडबंदर रोड परिसरात राहणारे गणेश कोकाटे हे कामगार पुरवणारे ठेकेदार (लेबर कॉन्ट्रॅक्टर) आहेत. ते शनिवारी पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास आपल्या कार मधून घोडबंदर रोडकडे जात होते. यावेळी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोल्डन डाईज नाक्यावर त्यांची कार आली असता मोटारसायकल वरून आलेल्या एका चार ते पाच जणांच्या टोळीने त्यांची कार अडवली. त्यापैकी दोघांनी कारवर पिस्तूलातून गोळीबार केला.

सुदैवाने या गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नाही. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. ठेकेदार गणेश कोकाटे यांनी त्वरित पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून चितळसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा हल्ला कोणी व कशासाठी केला याचा तपास आता पोलीस करीत आहे.

Web Title: Thane gang on a two wheeler bike fired at a car