शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी गैरव्यवहार : तुकाराम सुपे, प्रीतीश देशमुख यांचे प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 08:41 IST

TET Scam : अपात्र परीक्षार्थिंना पात्र करण्यासाठी त्यांनी प्रीतीश देशमुख याच्या सूचनेप्रमाणे अपात्र परीक्षार्थींना पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांना सांगितले होते, असे तपासातून पुढे आले आहे.

पुणे : टीईटी गैरव्यवहारात सायबर पोलिसांनी शनिवारी शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. अपात्र परीक्षार्थिंना पात्र करण्यासाठी त्यांनी प्रीतीश देशमुख याच्या सूचनेप्रमाणे अपात्र परीक्षार्थींना पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांना सांगितले होते, असे तपासातून पुढे आले आहे. टीईटी गैरव्यवहारात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. काही जणांनी दोन, तीन प्रश्न सोडविले; पण त्यांना ८४, ८२ असे मार्कस् देऊन पास करण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे.जी. ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतिश देशमुख याने वरिष्ठांना हाताशी धरून एजंटांमार्फत शिक्षकांशी संधान साधले होते. जे परीक्षार्थी पैसे देण्यास तयार होतील व पैसे देतील, त्यांना परीक्षेला गेल्यावर ओएमआर शीट कोरे ठेवायला सांगत. त्यानंतर प्रत्यक्ष पेपर तपासणीच्या वेळी हे ओएमआर शीट भरून या परीक्षार्थींना पास करायचे, असा हा संपूर्ण प्लॅन होता. मात्र, हे सर्वजण भ्रष्टाचाराबाबत इतके निर्ढावले की, त्यांनी अनेकांचे ओएमआर शीट भरलेच नाही. त्यांना थेट पास केले. सायबर पोलिसांनी ही सर्व शीट ताब्यात घेतली. त्यातील पात्र ठरलेल्या परीक्षार्थींची ओएमआर शीटची तपासणी सुरू केली तेव्हा त्यातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. परीक्षार्थींना शीट कोरे ठेवायला सांगितले असल्याने काहींनी किरकोळ ठिकाणी खुणा केल्या. पण, पैसे घेतल्यानंतर या परीक्षार्थींची ही कोरी शीट न भरताच त्यांची गुणवाढ केल्याचे बहुतांश शीटमध्ये दिसून आले आहे. काही जणांनी दोन, तीन प्रश्न सोडविले; पण त्यांना ८४, ८२ असे मार्कस् देऊन पास करण्यात आल्याचे तपासात आढळले आहे.टीईटीच्या २०१९- २० परीक्षेतील अपात्र ७ हजार ८८० परीक्षार्थींना अशा प्रकारे पात्र करण्यात आले आहे.

२०१८ मध्ये पुनर्मूल्यांकनात केले पात्रटीईटीच्या २०१८ मधील परीक्षेमध्येही अपात्र परीक्षार्थींना पात्र करून घेण्यात आले असून, त्यांच्याही ओएमआर शीटची तपासणी सध्या सुरू आहे. यामध्ये ज्यांच्याकडून पैसे घेण्यात आले होते; पण ते अपात्र ठरले. त्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायला सांगितले. त्यांचा ओएमआर शीट पुनर्मूल्यांकन करताना त्यांना पास करून पात्र केल्याचे आढळले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीexamपरीक्षा