शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२६ जानेवारीला होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ५ दहशतवाद्यांकडून स्फोटके जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 18:25 IST

जैश - ए - मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांना ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देजम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईत या दहशतवाद्यांना श्रीनगरच्या हजरतबल परिसरातून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे एजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद, साहिल फारुख आणि नसीर अहमद मीर अशी आहेत.

जम्मू - काश्मीर - २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना आज सायंकाळी जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईत या दहशतवाद्यांना श्रीनगरच्या हजरतबल परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेल्या अतिरेक्यांची नावे एजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद, साहिल फारुख आणि नसीर अहमद मीर अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे मोठे मोड्यूल गुरुवारी सायंकाळी हजरतबलजवळ या दहशतवाद्यांना अटक करून उध्वस्त केले आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, अटक दहशतवादी २६ जानेवारीच्या सुमारास श्रीनगरमध्ये आयईडी हल्ल्याचा कट रचत होते. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.

ग्रेनेड हल्ल्याच्या घटनांमध्ये सामील होते हे दहशतवादी पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे सर्व दहशतवादी खोऱ्यात जैश-ए-मोहम्मदसाठी काम करीत होते. अटक दहशतवादी खोऱ्यात झालेल्या दोन ग्रेनेड हल्ल्याच्या घटनांमध्येही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. एजन्सीचे अधिकारी या सर्वांकडून सखोल चौकशी करत आहेत. या दहशतवाद्यांकडून खोऱ्यातील दहशतवादी कारस्थानांबद्दल काही महत्वाची माहिती मिळू शकते असा विश्वास आहे.

दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले​​​​​​​

डीएसपीसह १३ जानेवारीला दहशतवाद्यांना केली होती अटक अलीकडेच काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील दोन दहशतवाद्यांना जवानांनी अटक केली होती. दहशतवाद्यांसह कुलगाममधील जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी देविंदर सिंग यांनाही अधिकाऱ्यांनी अटक केली. दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून देविंदर सिंगला अटक करण्यात आली होती.  नंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसArrestअटक