शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

Zomato Dog Bite: भयानक Video ! श्वानाने झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा प्रायव्हेट पार्ट चावला; पनवेलमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 16:48 IST

झोमॅटो डिलिव्हरी बॉयसोबत धक्कादायक प्रकार. श्वानाने प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला.

पनवेल : पनवेलमधील इंडियाबुल्सच्या हायफाय सोसायटीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा प्रायव्हेट पार्ट पाळीव कुत्र्याने चावल्याचा भयानक व्हिडीओ समोर आला आहे. हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा त्या कुत्र्याचा मालक हातात साखळी घेऊन होता. 

झोमॅटो किंवा अन्य कोणत्याही कंपनीचे डिलिव्हरी बॉय हे जोखमीचे काम करत असतात. त्यांना अपघात किंवा अन्य दुर्घटनांना सामोरे जावे लागते. पनवेलमध्ये भयानक प्रकार घडला आहे. डिलिव्हरी देऊन डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर पडत असताना कुत्र्याचा मालक लिफ्टमध्ये येत होता. हा कुत्रा जर्मन शेफर्ड जातीचा होता. डिलिव्हरी बॉय बाहेर पडत असताना मालकाने कुत्र्याला मागे ओढले. कुत्रा आत येत असल्याचे पाहून तो मागेही झाला. डिलिव्हरी बॉय बाहेर जाऊ लागला, याचवेळी कुत्र्याने उडी घेत तरुणाचा प्रायव्हेट पार्टला चावा घेतला. 

या हल्ल्यामुळे डिलिव्हरी बॉय रक्तबंबाळ झाला, वेदनेने विव्हळत होता. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने त्याला डीवाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याला अँटी रेबीज इंजेक्शन देण्यात आले आहे. तसेच प्रायव्हेट पार्टवर जिथे जखमा झाल्या आहेत, त्याला टाके घालण्यात आले आहेत. 

छोट्या बहीणीचा वाढदिवस होता...या झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयच्या छोट्या बहीणीचा त्याच दिवशी वाढदिवस होता. यामुळे त्याला सुटी घेण्यास सांगितले गोते. मात्र, विकेंडला जादा काम मिळते म्हणून तो कामाला गेला होता. त्या दिवसाची ती पहिलीच डिलिव्हरी होती, असे या तरुणाने सांगितले.  

टॅग्स :Zomatoझोमॅटोdogकुत्रा