शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भातसा नदीपात्रालगत दहा हातभट्ट्या पोलिसांकडून उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 12:37 IST

Kasara News : शहापूर तालुक्यातील भातसा नदी पात्रा लगत दाट झुडपातील बेकायदा गावठी दारूच्या 10 हातभट्या शहापूर पोलिसांच्या 3 पथकाने धाड टाकून उध्वस्त केल्या.

कसारा - शहापूर तालुक्यातील भातसा नदी पात्रा लगत दाट झुडपातील बेकायदा गावठी दारूच्या 10 हातभट्या शहापूर पोलिसांच्या 3 पथकाने धाड टाकून उध्वस्त केल्या. शहापूर तालुक्यातील भातसा नदीच्या लगत झाडी झुडपातील बेकायदा गावठी दारूच्या 10 हातभट्या उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पडघा व शहापूरच्या 3 पोलीस पथकाने धाड टाकून उध्वस्त केल्या शहापूर तालुक्यातील सरलांबा गावाच्या हद्दीतील भातसा नदी व कॅनल लगतच्या झाडी झुडपात असलेल्या दारू भट्या वर हि कारवाई करण्यात आल्याने दारू धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.लॉक डाऊन काळात सुरू होत्या गावठी दारूच्या हातभट्याठाणे जिल्ह्यातील विशेषतः शहापूर तालुक्यात दारू माफियांनी टाळेबंदीच्या काळात दारू विक्रीला बंदी असल्याने मोठ्या प्रमाणात नदी व कॅनल लगत गावठी दारूच्या हातभट्ट्या यापूर्वी पोलिसांनी उध्वस्त केल्या होत्या. मात्र, आता अनलॉक काळात पुन्हा झपटपट पैसे कमविण्यासाठी दारू माफियांनी तालुक्यातील सरलांबा गावाच्या हद्दीत नदी व कॅनल लगतच्या झाडी झुडपातील बेकायदा हातभट्या टाकून येथे शेकडो लिटर गावठी दारू तयार केली जात होती. याची खबर स्थानिक पोलिसांना मिळताच त्यांनी शहापूर उपविभागीय पथकातील 20 कर्मचारी आणि 5 महिला कर्मचारी तसेच आसीपी पडघा विभागातील 30 असे 50 ते 55 कर्मचाऱ्याचे 3 पथके गठीत करून या 10 गावठी दारूच्या हातभट्या उध्वस्त केल्या.3 हजार 830 लिटर वाँश आणि दारू बनविण्याचे साहित्य नष्ट केले धाडी दरम्यान घटनास्थळी असलेल्या 10 हातभट्टीवर दारू तयार करण्यासाठी लागणारे 3 हजार 830 लिटर कच्चामाल (वाँश) व दारू तयार करताना लागणारे साहित्य, असे एकूण 1 लाख 16 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी दिली. तर फरार झालेल्या दारू माफियांवर शहापूर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.1) शहापूर तालुक्यात अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही शहापूर तालुक्यात व उपविभागीय क्षेत्रात अवैध धंदे करणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल अवैध धंदे करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसून शहापूर कार्यक्षेत्रात गुन्हे गारीला आळा बसवण्यासाठी सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हेल्प लाईन नंबर सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती नव्याने पदभार घेतलेल्या शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे