शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत दहा किलो गांजा जप्त; दोन महिन्यात १९ किलो पोलिसांनी केला जप्त

By नितीन पंडित | Updated: March 1, 2024 19:13 IST

आरोपींकडून २ लाख १० हजार रुपयांचा गांजा,रिक्षा व मोबाईल असा एकूण ३ लाख ४० हजार ७७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

भिवंडी: शहरात शांतीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करीत दोघा जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून २ लाख १० हजार रुपयांचा गांजा,रिक्षा व मोबाईल असा एकूण ३ लाख ४० हजार ७७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.          शांतीनगर हद्दीत दोन इसम गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांना मिळाली.त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकातील कर्मचारी संतोष पवार,किरण जाधव,श्रीकांत पाटील,रोशन जाधव,रवींद्र पाटील,नरसिंह क्षीरसागर यांनी पाईप लाईन रोड पोगाव चौकी जवळ सापळा लावला असता त्याठिकाणी संशयित दोन इसम रिक्षामधून आले असता पोलिस पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांच्या रिक्षात १० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला.         याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालक गुलाब हुसेन इस्राईलमियाँ सलमानी वय २२ व सादीकअली बहादुर खान वय २७ वर्ष दोघे रा.टिटवाळा रोड, बनेली गाव ता.कल्याण या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ लाख १० हजार रुपयांचा गांजा,रिक्षा व मोबाईल असा  एकूण ३ लाख ४० हजार ७७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.          विशेष म्हणजे २०२४ मध्ये शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली मादक नशेचे पदार्थ विकणाऱ्यां विरोधात विशेष मोहीम सुरू केली ज्यामध्ये तीन गुन्ह्यात एकूण १९ किलो ६५० ग्रॅम वजनाचा ६ लाख ४ हजार २७० रुपये किमतीचा गांजा जप्त करीत आठ आरोपींना अटक केली आहे. तर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ११२ व्यक्तीं विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यापुढे ही अमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी यावेळी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी