शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:40 IST

नवविवाहित वधू ऐश्वर्या हिने तिचा विवाहित बॉयफ्रेंड व्ही तिरुमल रावसोबत पतीच्या हत्येचा कट रचला होता.

इंदूरच्या सोनम रघुवंशी हिने तिच्या पतीची हत्या केल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता तिच्यापासून प्रेरणा घेऊन तेलंगणातील एका महिलेने पतीची हत्या केली. नवविवाहित वधू ऐश्वर्या हिने तिचा विवाहित बॉयफ्रेंड व्ही तिरुमल रावसोबत पतीच्या हत्येचा कट रचला होता. पती तेजेश्वरची हत्या केल्यानंतर ती अंदमान किंवा लडाखमध्ये तिरुमलसोबत स्थायिक होण्याचा विचार करत होती. मात्र तिला पोलिसांनी पकडलं.

पतीच्या बाईकला लावलं GPS 

हत्येपूर्वी ऐश्वर्याने तेजेश्वरच्या बाईकमध्ये जीपीएस बसवलं होतं. तिने प्रथम कॉन्ट्रॅक्ट किलर्सना तिच्या पतीशी मैत्री करण्याचा टास्क दिला. तसेच पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी तिने १० मोबाईल फोनद्वारे कॉल केले. एसपी श्रीनिवास राव यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी १ चाकू, २ खंजीर, १ जीपीएस डिव्हाइस आणि १० मोबाईल फोन जप्त केले आहेत. खून करण्यासाठी, तिन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर्सनी तेजेश्वरचा मृतदेह नंद्यालमधील पन्यम घाट रोडजवळील कालव्यात फेकून दिला आणि त्याचा मोबाईल फोन कृष्णा नदीत फेकून दिला.

तिरुमल रावसोबत केलं हत्येचं प्लॅनिंग

तिरुमल राव हा कुर्नूलमधील कॅन फिन होम्स लिमिटेडमध्ये मॅनेजर आहे. तो लोकांना कर्ज मिळवून देण्यास मदत करायचा. हत्येच्या बदल्यात त्याने परशुरामदू आणि नागेशला पैसे आणि बँकेशी संबंधित काम लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. नंतर त्याने राजू नावाच्या व्यक्तीलाही त्याच्या प्लॅनिगमध्ये समाविष्ट केलं. त्याने तिन्ही किलर्सना ३.५ लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं. प्लॅनिंगनुसार, तिन्ही किलर्सनी १७ जून २०२५ रोजी तेजेश्वरला आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे नेले, जिथे तो गाडीत बसलेला असताना त्याची हत्या केली.

आईलाही केली अटक

१७ जून २०२५ रोजी तेजेश्वरचा फोन बंद असल्याने त्याच्या भावाने पोलीस तक्रार दाखल केली. तेजेश्वरच्या कुटुंबाला ऐश्वर्याचा संशय आला आणि लग्नाच्या एका आठवड्यानंतर दोघांमध्ये मतभेद असल्याचं पोलिसांना सांगितलं. ऐश्वर्याच्या सतत कोणाशी तरी फोनवर होणाऱ्या संभाषणांमुळे तेजेश्वर नाराज होता. ती व्यक्ती तिरुमल होती. तपासादरम्यान पोलिसांना ऐश्वर्याच्या तिरुमलासोबतच्या संबंधांची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचा अधिक तपासकेल्यानंतर असं आढळून आलं की ऐश्वर्याची आई सुजाता हिला  मुलीच्या दुष्कृत्यांची माहिती होती. तिलाही अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणाmarriageलग्न