शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या प्रेमविवाहाने वडील संतापले; जावयाच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करत घर पेटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:26 IST

घटनेनंतर आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू.

Hyderabad Crime : आपण स्वतःला 'मॉर्डन' समजतो, पण 'लव्ह मॅरिज'सारख्या गोष्टीला अजूनही भारतीय समाजात पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही. मुलांनी प्रेमविवाह केल्यामुळे घरच्यांनी धक्कादायक अथवा क्रुर कृत्य केल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील कक्करवाड गावातून समोर आली आहे. 

प्रेमविवाहा केल्याने जावयाचे घर पेटवले

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील मुदीराज कृष्ण आणि मोनिका यांनी अलीकडेच प्रेमविवाह केला होता. मात्र मोनिकाचे कुटुंब, विशेषतः तिचे वडील, या विवाहाला तीव्र विरोध करत होते. या विवाहामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर या तणावाचा शेवट हिंसक स्वरूपात झाला.  मोनिकाच्या वडिलांनी कृष्णच्या वडिलांवर हल्ला केला आणि त्यांच्या घराला पेटवून दिले.

घर जळाले, जीवावर बेतला हल्ला

या हल्ल्यानंतर कृष्णच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर ग्रामस्थांनी अग्निशामक दलाला कळवले, मोठ्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृष्णच्या कुटुंबाने तत्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीचे पडील फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे.

भारतात ‘लव्ह मॅरेज’ला आजही विरोध

2018 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, भारतातील 93 टक्के विवाह ‘अरेंज मॅरेज’ स्वरूपाचे होतात, तर केवळ 3 टक्के लव्ह मॅरेज आणि 2 टक्के ‘लव्ह-कम-अरेंज’ स्वरूपाचे होतात. यावरून स्पष्ट होते की, प्रेमविवाह अजूनही देशातील बहुतेक भागांत सामाजिकदृष्ट्या स्वीकारले गेलेले नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Father enraged by daughter's love marriage; attacks in-laws, sets house ablaze.

Web Summary : Telangana father, angered by daughter's love marriage, attacked his son-in-law's father and set their house on fire. The victim sustained serious injuries. Police are investigating; the father is absconding. Love marriages still face societal opposition in India.
टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टfireआग