शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
3
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
4
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
5
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
6
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
7
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
8
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
9
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
10
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
11
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
12
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
13
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
14
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
15
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
16
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
17
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
18
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
19
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
20
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

तेहलका बलात्कार प्रकरण : पीडीतेची उलटतपासणीस सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 16:29 IST

आजपासून सुरु झालेली उलट तपासणी तीन दिवसात संपवली जाईल. 

ठळक मुद्देआपल्या कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपालवर आहेम्हापसा सत्र न्यायालयाने पीडीतेच्या उलटतपासणीसाठी येत्या २१, २२ आणि २३ असे तीन दिवस निश्चित केले होते.

पणजी - २०१३ साली गाजलेल्या तेहलका बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी पत्रकार तरुण तेजपाल याने या प्रकरणातील पीडीतेची उलटतपासणी पुढे ढकलण्याची केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने फेटाळून लावली होती. त्यानंतर आज म्हापसा कोर्टात पीडितेची इन कॅमेरा उलटतपासणी दुपारपासून सुरु झाली. म्हापसा कोर्टात तेजपाल आणि पीडित तरुणीचे वकील हे देखील हजर झाले आहे. आजपासून सुरु झालेली उलट तपासणी तीन दिवसात संपवली जाईल. 

नुकतीच तेजपालने केलेली याचिका न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर सुनावणीस आली होती. म्हापसा सत्र न्यायालयाने पीडीतेच्या उलटतपासणीसाठी येत्या २१, २२ आणि २३ असे तीन दिवस निश्चित केले होते. तेजपाल यांनी या तारखांना आपले वकील पुढील दोन महिने उपस्थित राहू शकणार नाहीत अशी सबब देत उलटतपासणी डिसेंबरपर्यंत पुढे ढकलावी यासाठी सत्र न्यायालयाच्या आदेशास हायकोर्टात आव्हान दिले.या प्रकरणातील ट्रायल सप्टेंबर २०१७ मध्ये सुरु झालेली आहे. परंतु आपल्यावर ठेवलेले आरोप रद्दबातल ठरवावेत या मागणीसाठी तेजपाल याने मध्यंतर सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. परंतु, त्याची याचिका निकालात काढताना सुप्रिम कोर्टाने ६ महिन्यांच्या आत ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश कनिष्ठ न्यायालयाला दिले होते.२०१३ मध्ये बांबोळी येथील एका बड्या तारांकित हॉटेलमध्ये तेहलकाच्या इव्हेंटवेळी आपल्या कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपालवर आहे. त्याच्याविरुध्द भादंसंच्या कलम ३७६ (बलात्कार), ३४१, ३५४ अ आणि ३५४ ब खाली पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.

टॅग्स :Tarun Tejpalतरूण तेजपालRapeबलात्कारCourtन्यायालयgoaगोवा