शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा छापण्याचे तंत्र पुण्याच्या मित्राकडून एक लाखात घेतले; कमिशनवर तत्वावर व्हायचा व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 12:34 IST

आरोपी त्रिकुटाकडून सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि अन्य साहित्य जप्त

ठळक मुद्देमुख्य आरोपीने स्वतःच्या ग्राहक सेवा केंद्रात लॅपटॉप आणि प्रिंटरवर नोटा छापल्या२० हजार रुपयांत एक लाखाच्या बनावट नोटा विकायचे

औरंगाबाद : बनावट नोटा प्रकरणात सिडको पोलिसांनी धारूर (जि. बीड) येथून पकडून आणलेला आरोपी आकाश संपत्ती माने पुण्यातील मित्राकडून नोटा छापण्याचे तंत्रज्ञान एक लाखात खरेदी केल्याचे समोर आले. न्यायालयाने गुरुवारी आकाशला दि.१४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टीव्ही सेंटर येथे बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या संदीप श्रीमंत अरगडे आणि निखिल बाबासाहेब  संभेराव या दोघांना सिडको पोलिसांनी ८ डिसेंबर रोजी रात्री अटक केली. चौकशीत आरोपी आकाश मानेचे नाव समोर आले. पोलिसांनी धारूर येथे जाऊन आरोपी मानेला बुधवारी अटक करून आणले. मानेने स्वतःच्या ग्राहक सेवा केंद्रात लॅपटॉप आणि प्रिंटरवर नोटा छापल्याचे निष्पन्न झाले. आरोपी त्रिकुटाकडून सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि अन्य साहित्य जप्त केले. आरोपी आकाश माने, अरगडे आणि संभेराव यांची पोलिसांनी स्वतंत्र आणि समोरासमोर बसून  चौकशी केली. या चौकशीत आकाशने त्याचा पुण्यातील मित्र थोरात याच्याकडून नोटा तयार करण्याचे तंत्र एक लाखात खरेदी केल्याचे सांगितले. हे तंत्र पेन ड्राइव्हमध्ये मिळाल्याचे त्याने सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.

मानेला १४ पर्यंत पोलीस कोठडी आरोपी आकाश माने याला तपास अधिकारी प्रवीण पाटील यांनी  गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

कमिशन तत्त्वावर व्यवहारआकाशने आरोपी अरगडे याला २० हजार रुपयांत एक लाखाच्या बनावट नोटा दिल्या होत्या. अरगडे याने यातील १० हजारांच्या बनावट नोटा संभेरावला दिल्या. त्याकरिता ३ हजार ५०० रुपये कमिशन ठरले होते. त्यापैकी दीड हजार रुपये संभेरावकडून अरगडेने घेतले होते. संभेराव हा बनावट नोटा विक्री करण्यासाठी ग्राहकांचा शोध घेत, एका जणाला एक लाख रुपये देण्यासाठी तो आला होता. ३५ हजारांत एक  लाखाच्या बनावट नोटा विक्री करण्याची त्याची तयारी झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादMONEYपैसा