शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

तिकीट मागितल्यामुळे नागपूर विभागात टीसीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:46 PM

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत मुख्य तिकीट निरीक्षक लोकेंद्र बावसे यांनी यशवंतपूर-पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधील विनातिकीट प्रवाशांना तिकीट मागितले असता त्यांनी बावसे यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बैतूल-इटारसीदरम्यान घडली.

ठळक मुद्देयशवंतपूर-पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत मुख्य तिकीट निरीक्षक लोकेंद्र बावसे यांनी यशवंतपूर-पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधील विनातिकीट प्रवाशांना तिकीट मागितले असता त्यांनी बावसे यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बैतूल-इटारसीदरम्यान घडली.लोकेंद्र बावसे रेल्वेगाडी क्रमांक २२३५२ यशवंतपूर-पाटलीपुत्र सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांच्यासोबत आणखी सहा तिकीट तपासणीस होते. ते एस ६ कोचमध्ये तिकीट तपासणी करीत असता, त्यांना काही प्रवासी विनातिकीट आढळले. त्यांनी तिकीटाबाबत विचारणा करून तिकिटाची रक्कम देऊन पावती फाडण्यास सांगितले. त्यामुळे आरोपींनी बावसे यांना मारहाण सुरू केली. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तिकीट तपासणी कर्मचारी महेंद्र सिंह अणि डॅनियल फ्रान्सिस कोचमध्ये पोहोचले. गाडी बैतूल स्थानकावर पोहोचताच चार आरोपींना पकडून बैतूलला आणि चार आरोपींना इटारसी रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. लोकेंद्र बावसे यांना नागपूरच्या रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे