शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्पा मसाजसाठी पाठवला मेसेज, 150 कॉलगर्ल्सची मिळाली 'रेट लिस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 08:45 IST

Delhi Commission for Women sends notice to JustDial : स्वाती मालीवाल यांना सोशल मीडिया साइट जस्टडायलवर (Justdial) स्पा मसाजसाठी (Spa Massage) माहिती मिळवायची होती. त्यामुळे त्यांनी जस्टडायलवर मेसेज केला.

नवी दिल्ली : सोशल मीडियाचा वापर एकीकडे चांगल्या कामासाठी होताना दिसत आहे, तर दुसरीकडे याचा गैरवापर सुद्धा होत आहे. सोशल मीडिया हे  लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करत असताना दुसरीकडे सहजासहजी अवैध धंदे करण्याचे ठिकाणही बनत आहे. याचा पुरावा दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Delhi Commission for Women) स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यासोबत घडलेल्या घटनेत आढळून आला आहे. दरम्यान, स्वाती मालीवाल यांना सोशल मीडिया साइट जस्टडायलवर (Justdial) स्पा मसाजसाठी (Spa Massage) माहिती मिळवायची होती. त्यामुळे त्यांनी जस्टडायलवर मेसेज केला. त्यानंतर त्यांना 150 हून अधिक कॉलगर्लचे रेट सांगण्यात आले.  

स्वाती मालीवाल यांचे ट्विटया घटनेची माहिती स्वतः स्वाती मालीवाल यांनी ट्विटद्वारे दिली आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले की, "आम्ही जस्टडायलवर कॉल करून स्पा मसाजची खोटी चौकशी केली, त्यानंतर आमच्या फोनवर असे 50 मेसेज आले, ज्यामध्ये 150 हून अधिक मुलींचे दर सांगण्यात आले. मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला समन्स जारी करत आहे, या धंद्याला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय आहे?"

जस्ट डायल आणि पोलिसांना समन्स दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करायची आहे, त्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे. जस्टडायल स्वतः या प्रकरणात एक पक्ष आहे. मी शक्य ती कारवाई करेन. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हे खपवून घेतले जाणार नाही, असे दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीत स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची माहिती आहे. या ठिकाणी पोलीस वेळोवेळी छापे टाकतात. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीSocial Mediaसोशल मीडिया