शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बेपत्ता तरुणाची हत्या झाल्याचा संशय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 06:26 IST

ऑनलाइन जुगार प्रकरण : पगार मागितल्याने केली होती मारहाण

सूर्यकांत वाघमारे,लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : ऑनलाइन जुगार प्रकरणात पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. त्याच्याकडे काम करणारा एक तरुण चार वर्षांपासून बेपत्ता आहे. या दरम्यान, त्याचा कसलाही संपर्क झालेला नसल्याने त्याची हत्या केली असावी, असा संशय बेपत्ता तरुणाच्या कुटुंबीयांनी वर्तविला आहे.

गुन्हे शाखा पोलिसांनी सीबीडी येथील ऑनलाइन जुगारावर कारवाई केल्यानंतर, अड्डाचालक संभाजी पाटील याची धक्कादायक कृत्ये समोर येत आहेत. संभाजी हा अनेक वर्षांपासून अवैध धंद्यात असल्याने त्याच्या भ्रष्टाचाराची मुळे खोलवर रोवलेली आहेत. यामुळेच त्याच्या अटकेत विलंब होत असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, त्याच्याकडे काम करणारा सत्यवान पानेरे (२७) हा चार वर्षांपासून बेपत्ता आहे. पानेरे हा मूळचा सांगलीच्या कारवे गावचा असून, संभाजी पाटील यांच्याकडे कामाला होता. मात्र, दहा वर्षे काम करूनही त्याला नियमित पगार दिला जात नव्हता. मात्र, फेब्रुवारी, २०१६ मध्ये सत्यवान याने आजवरच्या कामाचा हिशोब संभाजीकडे मागितला होता. यावरून संभाजीने त्याला बेदम मारहाण केली होती, शिवाय दुसऱ्या दिवशी संभाजी हाच त्याला सोबत घेऊन गेला होता. मात्र, त्यानंतर सत्यवानबाबत आजपर्यंत काहीही माहिती समोर आलेली नसल्याचे त्याचा भाऊ सुखदेव पानेरे यांनी सांगितले.सत्यवानला संभाजीकडून दहा वर्षांच्या पगाराचे २० लाखांहून अधिक रुपयांचे येणे होते. 

घातपाताची शक्यता घटनेच्या दिवशी सत्यवानने ही रक्कम मागितल्यानेच, त्याला मारहाण करून त्याच्यासोबत घातपात केल्याची शक्यता सुखदेव यांनी वर्तवली आहे. संभाजीनेअनेक तरुणांना लॉटरी सेंटरमध्ये कामाला लावतो, असे सांगून आर्थिक पिळवणूक केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMurderखून