शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संशयातून भाच्याने केली मामीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 00:25 IST

आपटीबारी येथील घटना : आरोपी अटकेत, जादूटोणा केल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण/म्हारळ / टिटवाळा : ‘अंगात भूत असून, ते तंत्रमंत्र करून बाहेर निघेल,’ या अंधश्रद्धेपोटी अंगावर हळद टाकून काठीने केलेल्या मारहाणीत पंढरीनाथ शिवराम तरे आणि चंदूबाई शिवराम तरे या मायलेकाची घरातल्या व्यक्तींकडून हत्या झाल्याची कल्याणमधील घटना ताजी असतानाच मामीने जादूटोण्याने पत्नीचा मृत्यू झाला या संशयातून भाच्याने मामीची सुरा भोसकून हत्या केल्याची घटना कल्याण तालुक्यातील वाहोली आपटीबारी येथे मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहन चंदर वाघे असे अटक आरोपीचे नाव आहे.मोहनच्या पत्नीचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तिचा मृत्यू मामी गुलाबबाई मारवत वाघे हिने जादूटोणा केल्याने झाल्याचा संशय मोहनच्या मनात होता. या संशयातून गुलाबबाई मंगळवारी सांयकाळी अंगणात बसली असताना तिच्याशी मोहनने भांडण केले. मोहनने घरातून सुरा आणून गुलाबबाई हिच्या पोटात भोसकला. यात गुलाबबाई यांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी गुलाबबाई हिचा मुलगा गणपत याने टिटवाळा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मोहनला मंगळवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास अटक करण्यात आली. त्याने हत्या करताना वापरलेला सुराही पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मंगळवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.पुरोगामी राज्यालाफासला काळिमासंशयातून तसेच अंधश्रद्धेतून एकत्रित कुटुंब पद्धतीत दुहेरी हत्याकांड नुकतेच घडले. अंधश्रद्धेतून घडलेल्या या खळबळजनक हत्याकांडावरुन सर्वत्र टीका होत असतानाच, आता कल्याण तालुक्यातील वाहोली आपटीबार येथे जवळच्या नातेवाइकाकडून संशयातून झालेल्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. पुरोगामी विचारांच्या राज्याला अशा घटनांमुळे काळिमा फासला जात असल्याच्या प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Murderखून