शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी तब्बल 11 हजार वाहन चालकांचे परवाने होणार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 16:52 IST

गोव्यातील वाहतूक पोलिसांच्या मोहिमेला यश येत असल्याचा वाहतूक पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर यांचा दावा

सुशांत कुंकळयेकरमडगाव -  दारु प्यायची आहे तर गोव्यात जा! अशी सर्वसाधारण पर्यटकांमध्ये गोव्याची प्रतिमा असली तरी यापुढे दारु पिऊन गाडी चालवित असाल तर जरा सांभाळून, तुम्हाला त्यामुळे तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर तुमचा वाहन परवानाही काही काळासाठी निलंबित केला जाण्याचीही शक्यता आहे.सध्या गोव्यात वाहतूक पोलिसांनी दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्याविरोधात कडक मोहीम सुरु केली असून जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीतच दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या तब्बल 11,152 वाहन चालकांचे परवाने निलंबित करावेत यासाठी वाहतूक़ खात्याकडे शिफारस केली आहे. वाहतूक पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे या आठ महिन्यात तब्बल 2,775 वाहन चालकांचे परवाने निलंबितही करण्यात आलेले आहेत.वाहतूक विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाहतूक विभागाकडे संकलित केलेली माहिती 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट या दरम्यानची आहे. त्यानंतरच्या पुढच्या दोन महिन्यांतही अशा कित्येक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारे निलंबनाची कारवाई झालेल्या वाहन चालकांची संख्या चार हजारावर जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.गोव्यात दरवर्षी रस्ता अपघातात 250 ते 300 या दरम्यान बळी जातात. यातील बहुतेक बळी डोक्याला हॅल्मेट नसल्यामुळे जात असले तरीही दारु पिऊन वाहन चालवून होणा:या अपघातातही बरेचजण ठार होत असतात. एवढेच नव्हे तर कित्येकदा दारु पिलेल्या अवस्थेत वाहन चालविताना ठोकर दिल्याने काहीजणांना स्वत:चा दोष नसतानाही मृत्यू आला आहे. या पाश्र्र्वभूमीवर ही मोहीम हाती घेतली असून सध्या गोव्यात पर्यटन मौसम सुरु झालेला असताना ती अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनीही हीच भावना व्यक्त केली. कित्येक निरपराधांचे बळी जाण्यापासून रहावेत यासाठीच ही मोहिम हाती घेतल्याचे ते म्हणाले.काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सार्वजनिक वाहने चालविणाऱ्या बस चालकांच्या विरोधातही ही मोहीम हाती घेतली होती. एकाच दिवशी तब्बल 100 वाहन चालक दारु पिऊन वाहन चालवित असताना सापडले होते. या वाहन चालकांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. त्यात गोवा - मुंबई मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालकांचाही समावेश होता. एका मुंबईच्या चालकाला तर सात दिवसांचा तुरुंगवास ठोठविण्यात आला होता.गोव्याचे वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर यांची याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, या मोहिमेचा चांगला निकाल मिळालेला असून तुरुंगवासाच्या भीतीने कित्येकजणांनी दारु प्यालेल्या अवस्थेत वाहन चालविणे बंद केले आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. ही मोहीम यापुढेही चालू रहाणार असून अशा वाहन चालकांना शोधून काढण्यासाठी गोवा पोलिसांना आणखी 100 आल्कोमीटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामुळे अपघाताची संख्याही यंदा काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह