शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Mansukh Hiren death case: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी निलंबित पोलीस कॉन्स्टेबल, बुकीला अटक; ATS ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 12:27 IST

Mansukh Hiren death case : मुकेश अंबानींच्या घराखाली स्फोटकांनी भरलेली स्क़ॉर्पिओ ठेवल्याच्या प्रकरणाला दररोज वेगवेगळी वळणे लागत आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने महाराष्ट्र एटीएसकडून काढून केंद्राच्या एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. आज एटीएसने मनसुख हिरेन प्रकरणात दोघांना अटक केल्याचे सांगितले आहे. 

एकीकडे राज्यात सचिन वाझेंना (Sachin Vaze) महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांनी आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh)  यांनी केल्याने खळबळ उडालेली असताना दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. (Suspended Mumbai Police constable Vinayak Shinde and Naresh Dhare, a bookie arrested, in connection with Mansukh Hiren death case: Maharashtra ATS)

मुकेश अंबानींच्या घराखाली स्फोटकांनी भरलेली स्क़ॉर्पिओ ठेवल्याच्या प्रकरणाला दररोज वेगवेगळी वळणे लागत आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने महाराष्ट्र एटीएसकडून काढून केंद्राच्या एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. आज एटीएसने मनसुख हिरेन प्रकरणात दोघांना अटक केल्याचे सांगितले आहे. 

Parambir Singh: 'जिलेटीनपेक्षा 100 कोटींची चिठ्ठी अधिक स्फोटक'; कोणत्याही क्षणी केंद्राची महाशक्ती ED ची एन्ट्री शक्यमुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस कॉन्स्टेबर विनायक शिंदे आणि बुकी असलेला नरेश धरे याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. स्फोटक प्रकरणाचा तपास याआधी मुंबई पोलीस दलाच्या सीआययूचे प्रमुख आणि एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) करत होते. मात्र वाझे यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्याने हा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. यानंतर एनआयएने वाझेंनाचा अटक करताच त्यांनीच स्फोटकांची कार ठेवल्याचे तपासात समोर आले. वाझेंना २५ मार्चपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Sachin Vaze: सचिन वाझेंचे आयुष्यच रहस्यमय! स्वत:चे मेसेंजिंग अ‍ॅप, मराठी फेसबुक ते रितेश-जेनेलियावर खटला...

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचा परस्पर संबंध आल्याने एनआयएने हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही आपल्याकडेच देण्यात यावा अशी मागणी गृहमंत्रालयाकडे केली होती. महाराष्ट्र एटीएस याचा तपास करत होते. यासाठी आवश्यक परवानग्या गृह मंत्रालयाकडून एनआयएने मागितल्या होत्या. या परवानग्या एनआयएला गृहमंत्रालयाने आज दिल्या आहेत. यानुसार आजपासून एनआयएच मनसुख हिरेन प्रकरणात तपास करणार आहे.  एनआयएला खुनाची केस थेट हाती घेण्याचा अधिकार नाही. पण मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा संबंध अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारशी आहे. अंबानींच्या घराबाहेर आढळलेली कार हिरेन यांच्याच मालकीची होती. त्यामुळेच हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करण्याची विनंती करण्यात आली होती.

 

Mansukh Hiren: मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या परिसरात आणखी एक मृतदेह; मुंब्रा रेतीबंदर परिसरात खळबळ

मनसुख हिरेन यांचा मृत्यू नेमका कशामुळे?मनसुख हिरेन पाणी पडले त्यावेळी काही वेळ ते जिवंत होते. त्यांच्या फुफ्फुसात खाडीचं पाणी गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डायटम बोन अहवालातून समोर आली आहे. त्याआधी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एक अहवाल काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यात मनसुख यांनी स्वत:ला वाचवण्याचा थोडा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या फुफ्फुसात जास्त पाणी आढळून आलेलं नाही, अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून पुढे आली होती. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा